- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- कोल्हापूर दौऱ्यात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधिवत पूजा करून करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे घेतल...
कोल्हापूर दौऱ्यात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधिवत पूजा करून करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे घेतले दर्शन
शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीला कुंकुमार्चन अभिषेक करुन विधिवत पूजा केली. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून त्यांचे स्वागत करण्यात आले तसेच देवीची मूर्ती भेट म्हणून दिली. यावेळी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश क्षीरसागरही उपस्थित होते.
नववर्षानिमित्त करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. परंतु या सर्व गर्दीमध्ये जन्मदिनी खूप चांगले सहकार्य देऊन अतिशय प्रेमाने डॉ. नीलमताई गोऱ्हे यांचे स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या."हे नवीन वर्ष महाराष्ट्रसह देशाला सुख समाधानचे, शेतकऱ्यांना न्याय देणारे असावे, त्यासोबतच सर्वांना आरोग्य सौख्य योजने विजय लक्ष्मी प्राप्त व्हावी", अशी प्रार्थना यावेळी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी करवीर निवासीनी अंबाबाई देवीच्या चरणी केली.