नांदेडमध्ये महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला; ८ जणांचा मृत्यू

नांदेड: नांदेड जिल्ह्यातील आलेगाव येथे एक भीषण अपघात घडला आहे. हळद काढणीसाठी महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला. या अपघातात आतापर्यंत ८ महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. बचावकार्य सुरू आहे. ही घटना आज शुक्रवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड परिसरातील आलेगावमधील कांचननगर या ठिकाणी धक्कादायक घटना घडली आहे. सकाळी ७.३० च्या सुमारास ही घटना घडली. हिंगोली जिल्ह्यातील काही महिला मजूर यांना हळद काढणीसाठी एक ट्रॅक्टर जात होतं. मात्र त्या ट्रॅक्टर चालकाला विहिरीचा अंदाज आला नाही. त्यामुळे ट्रॅक्टर थेट विहिरीत जाऊन कोसळला. या विहिरीत पाणी असल्याने अनेक महिला यात बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला आहे.
       या घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले.  सध्या या ठिकाणी बचावकार्य सुरु आहे. या बचाव कार्यादरम्यान काही महिलांना पाण्यातून बाहेर काढण्यात आलं आहे. या दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. यातील दोन महिलांना पाण्याबाहेर काढण्यात पोलिसांना यश आलं आहे. मात्र ट्रॅक्टर ट्रॉली आणि काही महिला या विहिरीतच आहेत. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सर्व महिला हिंगोलीतील वसमत तालुक्यातील भुज गावात राहणाऱ्या आहेत. पाऊस पडल्याने ट्रॅक्टर स्लीप झाला. यानंतर चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर विहिरीत पडला.

Edited By: Lokprant

खबरें और भी हैं

पुण्यात वेळेत उपचार न मिळाल्याने महिलेचा मृत्यू ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले चौकशीचे आदेश

Latest News

पुण्यात वेळेत उपचार न मिळाल्याने महिलेचा मृत्यू ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले चौकशीचे आदेश पुण्यात वेळेत उपचार न मिळाल्याने महिलेचा मृत्यू ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले चौकशीचे आदेश
        पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तातडीने उपचार न मिळाल्याने श्रीमती तनिषा भिसे या भगिनीला आपला प्राण गमवावा लागला. ही
७ गावांतील ग्रामस्थ पुरंदर विमानतळाविरोधात आक्रमक, आज पासून बसणार उपोषणास
राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता; पुढील २४ तास धोक्याचे; ८ जिल्ह्यांना हाय अलर्ट
नाशिक जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशू कक्षात आग
कुर्ल्यातील फिनिक्स मॉलला लागली आग; अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software