- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- बुलढाण्यात चेक इन करन्सी च्या नावाखाली 1 लाखात 5 लाखाच्या नोटा देण्याचा दावा
बुलढाण्यात चेक इन करन्सी च्या नावाखाली 1 लाखात 5 लाखाच्या नोटा देण्याचा दावा
बनावट नोटा संबंधी बुलढाणा जिल्ह्यातून एक मोठी बाब समोर आली आहे. सोशल मीडियावरील इंस्टाग्राम वरून या बाबतचा व्हिडीओ व्हायरल झाला असून अंडर स्कोर शिव, अंडरस्कोर तांडव,अंडरस्कोर 99 च्या अकाउंट वरून एक लाखाच्या बदल्यात पाच लाख रुपयांच्या बनावट नोटा देण्याचा दावा या व्हिडीओ मधे करण्यात आला आहे. या दाव्यासाठी मोबाईल क्रं देखील देण्यात आला आहे त्यामुळे बुलढाण्यात खळबळ उडाली आहे. पोलीस मात्र या बद्दल अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे.
बुलढाणा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला याची एक सॅम्पल नोट मिळाली असून हे एक मोठे रॅकेट मध्यप्रदेशातुन चालवले जात आहे त्यावर आमच्या दोन टीम विविध ठिकाणी काम करत आहेत अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने दिली.
इंस्टाग्राम वरून व्हायरल झालेल्या या चेक इन करन्सी च्या व्हिडीओ मागील पार्श्वभूमी अशी की, काही महिन्यांपुर्वी मलकापूर परिसरातच एक मोठ रॅकेट पोलिसांनी पकडलं होत ज्यात बनावट नोटा छापण्याची दीड कोटीची मशीन जप्त करण्यात आली होती.त्या नंतर आता मालकापूर येथीलच पत्ता देण्यात येतोय तसेच मोबाईल क्रं देखील देण्यात आला आहे. त्यामुळे या गुन्ह्याला पुष्टी मिळते.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने याची दखल घेतली असून त्यांना बनावट नोटांचे सॅम्पल देखील मिळाले आहे व या रॅकेट चे लवकरच भांडा फोड करू अशी माहिती देण्यात आली. या सगळ्या मुळे बुलढाणा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.