- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे ऑनलाईन अर्ज करण्यास १५ जानेवारीपर्यंतची अंतिम मुदत
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे ऑनलाईन अर्ज करण्यास १५ जानेवारीपर्यंतची अंतिम मुदत
विद्यार्थ्यांचे उशिरा सुरू होणारे शैक्षणिक सत्र सद्यस्थितीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेत असलेले तसेच नव्याने या योजनेसाठी अर्ज करणारे विद्यार्थी यांना ऑनलाईन अर्ज करताना तांत्रिक अडचणी येत असल्याने समाज कल्याण विभागाने स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत १५ जानेवारी २०२५ पर्यंत वाढविली आहे.
समाजकल्याण विभागामार्फत शासकीय वसतिगृहाच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत आज्ञावली (सॉफ्टवेअर) विकसनाचे काम प्रगतीपथापर असून त्यामध्ये ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याचे मॉड्यूल कार्यरत झाले आहे. त्यानंतर स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत वेळोवेळी ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत वाढविण्यात आलेली होती. तथापि, तांत्रिक अडचणीमुळे अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून समाज कल्याण आयुक्तांनी पुन्हा १५ जानेवारीपर्यंतची मुदत वाढविली आहे.
समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहासाठी ऑनलाईन अर्ज केला नाही अशा विद्यार्थ्यांनी वरील पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. देण्यात आलेली मुदतवाढ अंतिम मुदतवाढ असून त्यानंतर कोणत्याही प्रकारे नवीन मुदतवाढ देण्यात येणार नसल्याने वरील अंतिम दिनांकापर्यंत अर्ज करतील अशाच विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. तरी पुणे जिल्ह्यातील महाविद्यालयांत व्यवसायिक, अव्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी https://hmas.mahait.org या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.