- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- नाशिक जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशू कक्षात आग
नाशिक जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशू कक्षात आग

६९ नवजात बाळांना त्वरीत दुसऱ्या कक्षात हलवले
नाशिक: नाशिक जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशू कक्षात शॉर्ट सर्किटमुळं आग लागल्याची घटना घडली आहे. छोट्या बाळांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. कक्षात ६९ नवजात बालक होते, त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या दृष्टीनं पावलं टाकण्यात येत आहे. शॉर्ट सर्किट झाल्यानंतर त्वरित सर्व बालकांना दुसऱ्या कक्षात हलवण्यात आलं. सुदैवाने कोणतीही अनुचित घटना घडली नाही. शॉर्ट सर्किट झाल्याचे लक्षात आल्यानंतर सर्व परिचरिकांनी लगेच बालकांना सुरक्षित दुसऱ्या कक्षात हलवले.
शॉर्ट सर्किटनं आग लागल्यानं मातांची धावपळ झाल्याचं पाहायला मिळालं. ६९ नवाजत शिशूंना शेजारच्या वॉर्डमध्ये नेण्यात आलं आहे. शॉर्ट सर्किट कशामुळं घडलं याचं कारण समोर आलं नाही.नाशिक जिल्हा रुग्णालयातील दुसऱ्या कक्षात ठेवत त्या बाळांवर उपचार करण्यात येत आहे. या ठिकाणी नातेवाईकांची गर्दी झाली होती. तिसऱ्या मजल्यावर पीयूसी कक्ष आहे. दुसऱ्या मजल्यावर असलेल्या नवजात बाळांचा कक्ष आहे. दुपारी शॉर्ट सर्किट झाल्यामुळे धूर निघाला होता. त्यामुळे ६९ बाळांना तातडीने तिसऱ्या मजल्यावरील या पीसूसी कक्षात हलवण्यात आलं. कोणत्याही बाळाला दुखापत झाली नाही. सगळ्या बाळांची प्रकृती ठीक आहे, अशी माहिती नाशिक जिल्हा रुग्णालयाने दिली. मात्र, नवजात बाळांच्या कक्षात शॉर्ट सर्किट कशामुळे झाली, याची माहिती अद्याप कळू शकली नाही. रुग्णालयात प्रशासनाकडून कक्षाच्या दुरस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

खबरें और भी हैं
ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे निधन
