ओडिसामध्ये रेल्वेचा भीषण अपघात; कामाख्या एक्स्प्रेसचे ११ एसी डबे रुळावरून घसरले

कटक: ओडिसामध्ये भीषण रेल्वे अपघात घडला आहे. आज रविवारी कामाख्या एक्स्प्रेसचे ११ एसी डबे रुळावरून घसरले आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली असल्याचे वृत्त नाही. रेल्वे अधिकाऱ्यांनी अपघाताची पुष्टी केली आणि माहिती देताना सांगितले की, आज रविवारी सकाळी ११.५४ वाजता ईस्ट कोस्ट रेल्वेच्या खुर्दा रोड विभागातील कटक-नारागुंडी रेल्वे विभागात ही घटना घडली. 
एसएमव्हीटी बेंगळुरू-कामाख्या एसी सुपरफास्ट एक्स्प्रेस (12551) बेंगळुरूहून गुवाहाटीच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मदत आणि बचावकार्य सुरू केले. अपघातग्रस्त रिलीफ ट्रेन आणि मेडिकल रिलीफ ट्रेनही तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आली. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. रेल्वेने प्रवासी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी एक हेल्पलाइन क्रमांक – 8991124238 जारी केला आहे. बेंगळुरू आणि आसाम दरम्यान धावणाऱ्या कामाख्या एक्स्प्रेसचे 11 एसी डबे रुळावरून घसरले, त्यानंतर प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. चौद्वार भागातील मांगुली पॅसेंजर हॉल्टजवळ ट्रेन रुळावरून घसरल्याचे सांगण्यात येत आहे. बचावकार्यासाठी एनडीआरएफ आणि वैद्यकीय पथके पाठवण्यात आली आहेत. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे. वैद्यकीय पथक, एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाचे जवान बचाव कार्य करत आहेत. अडकलेल्या प्रवाशांना त्यांच्या स्थळी सुखरूप पोहोचता यावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
       ईस्ट कोस्ट रेल्वेचे सीपीआरओ अशोक कुमार मिश्रा यांनी सांगितले की, आम्हाला कामाख्या एक्स्प्रेसचे (12551) काही डबे रुळावरून घसरल्याची माहिती मिळाली आहे. ते म्हणाले, आतापर्यंत 11 एसी डबे रुळावरून घसरल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. यात कोणीही जखमी झालेले नाही. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. सीपीआरओ पुढे माहिती देताना म्हणाले की, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारीही लवकरच घटनास्थळी पोहोचणार आहेत. डीआरएम खुर्द रोड, जीएम/ईसीओआर आणि इतर वरिष्ठ पातळीवरील अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. हा प्रकार कसा घडला हे तपासानंतरच कळेल. कामाख्या एक्स्प्रेस रुळावरून घसरल्याच्या घटनेवर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले, 'मला ओडिशातील (12551) कामाख्या एक्स्प्रेसशी संबंधित घटनेची माहिती मिळाली आहे. आसामचे सीएमओ ओडिशा सरकार आणि रेल्वेच्या संपर्कात आहेत. परिस्थिती लवकरच पुर्वपदावर येईल.

Edited By: Lokprant

खबरें और भी हैं

पुण्यात वेळेत उपचार न मिळाल्याने महिलेचा मृत्यू ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले चौकशीचे आदेश

Latest News

पुण्यात वेळेत उपचार न मिळाल्याने महिलेचा मृत्यू ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले चौकशीचे आदेश पुण्यात वेळेत उपचार न मिळाल्याने महिलेचा मृत्यू ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले चौकशीचे आदेश
        पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तातडीने उपचार न मिळाल्याने श्रीमती तनिषा भिसे या भगिनीला आपला प्राण गमवावा लागला. ही
७ गावांतील ग्रामस्थ पुरंदर विमानतळाविरोधात आक्रमक, आज पासून बसणार उपोषणास
राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता; पुढील २४ तास धोक्याचे; ८ जिल्ह्यांना हाय अलर्ट
नाशिक जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशू कक्षात आग
कुर्ल्यातील फिनिक्स मॉलला लागली आग; अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software