टॉकीयो ऑलिम्पिक मधील कांस्य पदक विजेता भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियाला 4 वर्षांसाठी केले निलंबित

     भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनिया पुन्हा एकदा चर्चेत येत आहे. त्याला पुढील चार वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. नॅशनल अँटिडोपिंग एजन्सी NADA ने टोकियो ऑलंपिक  कांस्य पदक विजेता बजरंग पुनियाला  डोपिंग विरोधी शिस्तीचे पालन समितीने नियम 2.3 ( नमुने न देणे फरार होणे नमुना प्रधान करण्यास नकार देणे)उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळल्यावर बंदी घातली. बजरंग पुनिया हा भारतीय कुस्तीपटू आहे. त्यांनी टोकियो येथे झालेल्या पहिल्या ऑलम्पिक स्पर्धेत कांस्यपदक पटकावून देशाचा गौरव केला. बजरंग पुनिया याने NADA ला 10 मार्च रोजी राष्ट्रीय संघ निवड टेस्ट दरम्यान डोपिंग चाचणीसाठी नमुने न दिल्याने NADA  ने त्याला मंगळवारी दोषी ठरवले.

     पुनियाने या आरोपांविरुद्ध 11 जुलै रोजी अपील दाखल केले होते, यावर  विनीत धांडा यांच्या नेतृत्वाखालील पॅनल ने 30 सप्टेंबर व 4 ऑक्टोबर रोजी आभासी सुनावणी नंतर बजरंग वर बंदी घालण्यात आली. सुरुवातीला 23 एप्रिल रोजी तात्पुरती बंदी घालण्यात आली होती. खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया आता कोणत्याही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळू शकणार नाही.बजरंग पुनिया ला जागतिक स्तरावरील कुस्ती संघटना UWW ने त्यावर बंदी घातली आहे.  DOP कंट्रोल ऑफिसरला नमुने देण्यास नकार देण्याचे हे वर्तन त्याच्या संघातील सहकारी आणि इतर खेळाडूंच्या समोर एक वाईट उदाहरण असेल  व त्याच्या अशा वागण्याने खेळाच्या प्रतिष्ठेवर परिणाम होतो त्यामुळे पॅनलला त्यावर चार वर्ष बंदी घालवी लागली आहे  त्याचे हे वर्तन NADA च्या नियमांच्या विरोधात आहे आणि खेळाच्या भावनांचे उल्लंघन करणारे आहे.

    कुस्तीपटू बजरंग पुनियाने टॉकीयो येथे झालेल्या पहिल्या ऑलिंपिक स्पर्धेत कांस्यपदक  पटकावले होते.त्याचा जन्म झज्जर येथील एका सामान्य कुटुंबात झाला. त्याचे वडील कुस्तीपटू होते. त्याने वयाच्या चौदाव्या वर्षीच कुस्तीच्या आखड्यात प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. नंतर ऑलिंपिक पदक विजेता योगेश्वर दत्तच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीतील अनेक बारकावे शिकून 2013 च्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप मध्ये आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये विजयी होऊन देशाचा नाव मोठे केले. बजरंग पुनियाने ऑक्टोबर महिन्यात किसान काँग्रेसचे कार्याध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारत राजकारणात एंट्री केली. आधी देखील त्यांनी विनेश फोगाट सोबत राजकारणात हात मिळवणी केली होती.

Edited By: Lokprant

खबरें और भी हैं

  शिवेंद्रराजेंचे जावळीत जल्लोषात स्वागत

Latest News

  शिवेंद्रराजेंचे जावळीत जल्लोषात स्वागत शिवेंद्रराजेंचे जावळीत जल्लोषात स्वागत
          महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे सातारा जावली मतदारसंघात कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी मोठ्या
भारतातले पहिले थर्माकोल म्युझियम दहिवडीत 
अतित ते मत्यापूर रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात
खेड ग्रामपंचायतीतील बोगस सही प्रकरणातील दोषीवर गुन्हे दाखल करण्याचे गटविकास अधिकाऱ्यांचे आदेश
दहिवडीची स्वराली साठे कुस्ती स्पर्धेत जिल्ह्यात तिसरी

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software