- Hindi News
- राष्ट्र
- जगप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसेन यांनी घेतला अखेरचा श्वास
जगप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसेन यांनी घेतला अखेरचा श्वास
जगप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसेन यांचं निधन झाल्याची दुःखद घटना घडली. अमेरिकेतल्या सॅनफ्रान्सिस्को हॉस्पिटल मध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते.वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. झाकीर हुसेन यांना तब्बेतीच्या अनेक कारणांमुळे अमेरिकेत सॅनफ्रान्सिस्को रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
झाकीर हुसेन हे एक भारतीय तबला वादक, संगीतकार, तालवादक, संगीत निर्माता आणि चित्रपट अभिनेता होते. त्यांना जगातील महान तबला वादकांपैकी एक म्हणून ओळखले जाते. झाकीर हुसेन अल्लारका कुरेशी यांचा जन्म 9 मार्च 1951 रोजी मुंबई येथे झाला. व त्यांनी माहीम येथील सेंट मायकल हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले आणि सेंट झेवियर्स कॉलेज, मुंबई येथून पदवी चे शिक्षण प्राप्त केले होते.
त्यांना भारत सरकारने 1988 मध्ये पद्मश्री , 2002 मध्ये पद्मभूषण आणि 2023 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले.त्यांना 1990 मध्ये भारत सरकारचा संगीत अकादमी पुरस्कार , संगीत नाटक अकादमी फेलोशिप, 2018 मध्ये रत्ना सदस्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.झाकीर हुसेन यांचे वडील देखील तबला वादक होते.झाकीर हुसेन हे पहिले भारतीय सांगितकार आहेत ज्यांना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी व्हाईट हाऊस मध्ये जागतिक मैफिलीसाठी आमंत्रित केले होते.