- Hindi News
- राष्ट्र
- म्यानमार-थायलंडमध्ये शक्तीशाली भूकंपाने हाहाकार; १४४ जणांचा मृत्यू; ७०० हून अधिकजण जखमी
म्यानमार-थायलंडमध्ये शक्तीशाली भूकंपाने हाहाकार; १४४ जणांचा मृत्यू; ७०० हून अधिकजण जखमी
By Lokprant
On

बँकॉक: म्यानमार-थायलंडमध्ये शक्तीशाली भूकंपाने हाहाकार उडाला असून ७.७ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपात आतापर्यंत १४४ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे. तर ७०० हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

म्यानमारमध्ये दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ७.७ तीव्रतेचा भूकंप झाला. त्यानंतर मांडले शहरात ६.५ तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपाचे हादरे म्यानमारसहित थायलंड, भारत, बांगलादेश आणि चीन सारख्या देशांनाही बसले. या भूकंपाचा केंद्रबिंदू मध्य म्यानमार होता. दोन भूकंपामध्ये १२ मिनिटांचा फरक होता. शहरातील अनेक इमारती कोसळल्या. या भूकंपामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान, म्यानमार आणि थायलंड या दोन्ही देशामध्ये भूकंपाचे हादरे जाणवले. केंद्रबिंदू म्यानमार असलेल्या भूकंपाने दोन्ही देशांमध्ये किती वित्तहानी झाली आहे. याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. म्यानमारच्या स्थानिक वेळेनुसार दुपारच्या वेळेस झालेला भूकंप १० किलोमीटर खोलवर होता. या भूकंपामुळे मणिपूर, अरुणाचल प्रदेश, आसाम, नागालँड, नोएडा आणि गाझियाबादमध्ये जमीन थरथरू लागल्याने लोक घराबाहेर आले होते.
Edited By: Lokprant

खबरें और भी हैं
ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे निधन
By Lokprant

Latest News
04 Apr 2025 15:45:56
पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तातडीने उपचार न मिळाल्याने श्रीमती तनिषा भिसे या भगिनीला आपला प्राण गमवावा लागला. ही