- Hindi News
- पुणे
- पुणे जिल्हा परिषदेच्या पाचवी ते आठवी विद्यार्थिनींना आता शाळेत येण्यासाठी सायकल
पुणे जिल्हा परिषदेच्या पाचवी ते आठवी विद्यार्थिनींना आता शाळेत येण्यासाठी सायकल

पुणे: आठवीपर्यंतच्या विद्यार्थिनींची पायपीट आता बंद होणार आहे. जिल्हा परिषदेने सायकल बैंक उभी करण्याचा निर्णय घेतला असून, या सर्व विद्यार्थिनींना आठवीचे शिक्षण पूर्ण करेपर्यंत मोफत सायकल दिली जाणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून ही योजना सुरू केली जाणार आहे

पाचवी ते आठवीमध्ये शिकणाऱ्या मुलींची संख्या सुमारे ३५ हजारांपर्यंत आहे. तेवढ्या प्रमाणात सायकली सायकल बँकमध्ये उपलब्ध करून दिले जातील. प्रामुख्याने सीएसआर त्याचबरोबर आवश्यकता भासल्यास काही प्रमाणात जिल्हा निधी यासाठी खर्च केला जाईल. या सर्व सायकली या जिल्हा परिषदेच्या असतील. शाळामार्फत त्या विद्यार्थिनींना दिल्या जातील. येत्या शैक्षणिक वर्षापासून हा। उपक्रम सुरू केला जाणार असल्याचे गजानन पाटील यांनी सांगितले.
स्मार्ट स्कूल ही संकलना संकल्पना शैक्षणिक वर्षापासून सुरू होईल. गुणवत्ता वाढ आणि शैक्षणिक सुविधा तसेच शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. जिल्हा परिषद शाळेतील मुलींना सायकल बँकच्या माध्यमातून मोफत सायकल दिली जाईल. त्यामुळे मुलींचे शाळेत येण्याचे प्रमाण वाढेल, तसेच वेळेची बचत होऊन हा वेळ त्यांना अभ्यासासाठी मिळू शकेल.

खबरें और भी हैं
ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे निधन
