- Hindi News
- पुणे
- पुस्तक विक्री स्टॉल लावण्यासाठी २७ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
पुस्तक विक्री स्टॉल लावण्यासाठी २७ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील मौजे पेरणे येथे १ जानेवारी २०२५ रोजी आयोजित विजयस्तंभास अभिवादन सोहळ्याच्यावेळी पुस्तक विक्री स्टॉल लावण्यासाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन स.नं.१०४/१०५, विश्रांतवाडी रोड, पोलीस स्टेशन समोर, येरवडा, पुणे येथे २७ डिसेंबर २०२४ रोजी दु.१२ वाजेपर्यंत अर्ज सादर करावे.
स्टॉलकरीता कार्यालयाच्यावतीने उपलब्ध करुन देण्यात आलेल्या विहित नमुन्यात आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज केवळ प्रत्यक्ष या कार्यालयात तसेच [email protected] या ईमेल पत्त्यावर स्वीकारले जाणार आहेत. इतर कोणत्याही समाज माध्यमांद्वारे स्विकारले जाणार नाहीत.
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य किंवा क्षमतेपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास लॉटरी पद्धतीने स्टॅल वाटप करण्यात येणार आहे. स्टॉल वाटपाबाबत सर्व अधिकार तसेच याबाबत कोणतीही तक्रार प्राप्त झाल्यास त्याबाबचे सर्व अधिकार सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण पुणे यांचेकडे राहतील, याची सर्वांनी नोंद घ्यावी, अशी माहिती समाज कल्याण सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.