- Hindi News
- पुणे
- ओबीसी समाजाकडून जरांगे पाटलांवर पुण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी
ओबीसी समाजाकडून जरांगे पाटलांवर पुण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी
पुणे पत्रकार संघामध्ये ओबीसी नेते श्री. मंगेश ससाने आणि श्री. बाळासाहेब सानप यांनी दि. 6 रोजी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत बोलताना श्री. ससाने यांनी वंजारी समाजावर ठरवून लक्ष करण्याच्या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. श्री. ससाने म्हणाले, "मनोज जरांगे यांच्या 'घरात घुसून मारीन' या वक्तव्याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो आणि त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी करतो." या मुद्द्यावर बाळासाहेब सानप यांनीही आपली भूमिका स्पष्ट करत, "आमच्या समाजातील तरुण स्वतःच्या कर्तृत्वाने पुढे जात आहेत. त्यांना अशा वादात ओढण्याचा प्रयत्न करू नये," असे स्पष्ट केले.
या वेळी अंजली दमानिया यांच्या विधानांचा देखील निषेध करण्यात आला. याच परिषदेत श्री. ससाने आणि श्री. सानप यांनी सुरेश धस यांची भूमिका ही दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणारी आणि सामाजिक शांतता भंग करणारी असल्याचे नमूद केले. या पत्रकार परिषदेच्या नंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जवळपास शंभर लोकांचा जमाव जमा झाला. या जमावाने पोलिसांना निवेदन सादर करून मनोज जरांगे यांच्या अटकेची मागणी केली.
पत्रकारांशी बोलताना ओबीसी आघाडीच्या नेत्या सौ. गौरी पिंगळे यांनी देखील या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी मनोज जरांगे, सुरेश धस, आणि अंजली दमानिया यांच्यावर जोरदार टीका केली