- Hindi News
- सातारा
- मोबाईलच्या वादातून दारूच्या नशेत एकास बेदम मारहाण
मोबाईलच्या वादातून दारूच्या नशेत एकास बेदम मारहाण
सातारा येथील पोवई नाका परिसरातील गॅलेक्सी बार येथे झालेल्या वादातून 45 वर्षीय व्यक्तीस मारहाण करण्यात आली आहे. महेश रामचंद्र जाधव (वय 45 वर्ष) रा. प्रतापगंज पेठ, सातारा असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. महेश जाधव यांचा गाड्या खरेदी विक्रीचा धंदा आहे. दि 31 रोजी महेश जाधव व आरोपी संतोष जाधव यांच्यात मोबाईल फोन वरून वादावादी झाली होती त्यानंतर 1 जानेवारी रोजी रात्री महेश जाधव हे आपल्या कुटुंबियांसमवेत 10.30 वाजता जेवण करून घरी बसले असता त्यांच्याच ओळखीतले संतोष उर्फ अरुण सुरेंद्र जाधव हे घरी आले व दगड मारून खिडकीच्या काचा फोडल्या. यावेळी त्यांचा चुलत भाऊ निवास जाधव व प्रमोद जाधव यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता तो महेश जाधव यांच्या जुन्या घरी गेला व दारू पिऊन शिवीगाळ करू लागला. महेश जाधव यांनी शिवीगाळ करण्याचे कारण विचारले असता त्याने महेश जाधवांना लाथा बुक्क्यांनी मारण्यास सुरुवात केली. यामध्ये महेश जाधव यांना खुब्याला दुखापत झाली असून डोळ्यावर मार लागल्याने इजा झाली आहे.
आरोपी संतोष जाधव याने महेश जाधव यांची पत्नी माधुरी जाधव व आई इंदिरा जाधव यांच्यावर देखील हात उचलला असून त्यांना शिवीगाळ केली आहे. माधुरी जाधव यांनी संतोष जाधव यांच्या विरुद्ध सातारा येथील शाहुपुरी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली आहे. मारहाणीत महेश जाधव यांचा पाय फ्रॅक्चर झाला असून त्यांच्यावर सातारा येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. संतोष जाधव यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी व नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी त्यांच्या कुटुंबियांकडून करण्यात आली आहे.