- Hindi News
- सातारा
- कृषि विज्ञान केंद्रातर्फे रायगाव येथे शेळी वाटप व प्रशिक्षण संपन्न
कृषि विज्ञान केंद्रातर्फे रायगाव येथे शेळी वाटप व प्रशिक्षण संपन्न

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव तालुका जिल्हा सातारा तर्फे आदिवासी विकास प्रकल्प(TSP) अंतर्गत शेळी वाटप व शेळीपालन प्रशिक्षण रायगावं ता जावळी येथे संपन्न झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सातारा जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन डॉ. दिनकर बोर्डे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना शेळीपालन व्यवसायाचे महत्त्व तसेच व्यवसाय करत असताना घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले. पंचायत समिती जावळीचे विस्तार अधिकारी पशुसंवर्धन डॉ. अनिल चपने यांनी जनावरांचे आजार व्यवस्थापन याविषयी माहिती दिली. पशुधन विकास अधिकारी, सायगाव डॉ. माधव जाधव यांनी विमा संरक्षण व पशुवैद्यकीय दवाखान्यामधून मिळणाऱ्या सेवांबद्दल माहिती दिली. कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव डॉ. महेश बाबर यांनी लाभार्थी कुटुंबीयांना शेळ्यांचे योग्य संगोपन करून शेळीपालन व्यवसाय वाढवण्याचे आवाहन केले. यावेळी रायगावच्या सरपंच श्रीमती हसीना मुजावर यांनी गावामध्ये राबवण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या योजनांबाबत माहिती दिली. उपविभागीय कृषी अधिकारी श्री. संतोष बरकडे यांनी शेळीपालन व नैसर्गिक शेती हे परस्पर पूरक कसे आहेत याविषयी माहिती दिली. श्री भूषण यादगिरवार, विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव यांनी नैसर्गिक शेती बाबत मार्गदर्शन केले. श्री संजय घोरपडे मंडळ कृषी अधिकारी, कुडाळ यांनी नैसर्गिक शेती योजनेबाबत माहिती दिली. प्रगतशील शेतकरी श्री जितेंद्र कदम यांनी आपल्या शेतामध्ये राबवण्यात येणाऱ्या प्रयोगांबाबत माहिती दिली.


खबरें और भी हैं
ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे निधन
