- Hindi News
- सातारा
- त्रिंबकराव काळे विद्यालयाचा एन.एम.एम.एस. मध्ये खणखणीत चौकार
त्रिंबकराव काळे विद्यालयाचा एन.एम.एम.एस. मध्ये खणखणीत चौकार
By Lokprant
On

माण तालुक्यात प्रथम क्रमांकासह सर्वात जास्त १७ शिष्यवृत्तीधारक ; सारथीत २१ पात्र
सातारा: रयत शिक्षण संस्थेच्या त्रिंबकराव काळे विद्यालय मलवडी या शाळेने एन.एम.एम.एस. परीक्षेतील आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम राखत खणखणीत चौकार मारला आहे. माण तालुक्यात प्रथम क्रमांकासह सर्वात जास्त शिष्यवृत्तीधारक याच शाळेचे आहेत. एन.एम.एम.एस. शिष्यवृत्तीधारक १७ तर सारथीत २१ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. दिपराज आबासो पवार याने तालुक्यात प्रथम तर जिल्ह्यात आठवा क्रमांक मिळवला आहे.
त्रिंबकराव काळे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा २०२१/२२ व २२/२३ मध्ये माण तालुक्यात प्रथम क्रमांक आला होता. तसेच या दोन्ही वर्षी प्रत्येकी १३ जण शिष्यवृत्तीधारक बनले होते. मागील वर्षी माण तालुक्यातील प्रथम क्रमांक फक्त एका गुणाने हुकला तरी तब्बल २० विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनले होते. यंदा पुन्हा एकदा तालुक्यातील सर्वात जास्त शिष्यवृत्तीधारकांसह प्रथम क्रमांक मिळवन शाळेने नवीन किर्तीमान स्थापित केला आहे.
एन.एम.एम.एस. शिष्यवृत्तीधारकांमध्ये दिपराज पवार, सानवी सत्रे, वेदांत पवार, आर्यन सुर्यवंशी, आयुष मगर, वैष्णवी सावंत, शिवानी काळे, अमृता नवले, श्रावणी शेंडे, आर्यन शेंडे, सोहेल मुलाणी, प्रणव शेळके, राजवर्धन कदम, प्रणाली भुजबळ, प्रणाली वाघमोडे, दिग्विजय सोनवणे, अजिंक्य खरात यांचा समावेश आहे. विद्यालयाच्या या उज्वल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत दळवी, प्रभाकर देशमुख, डॉ. अनिल पाटील, सचिव विकास देशमुख यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिक्षण विभागाचे अधिकारी, सरपंच दिपाली जगदाळे, मुख्याध्यापक अनिल भुजबळ, पर्यवेक्षक जोतीराम काटकर, सर्व कमिट्यांचे पदाधिकारी, सर्व शिक्षक, आजी-माजी विद्यार्थी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ, पालक यांनी अभिनंदन केले .
मनोजकुमार बंडगर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव
या शाळेचे माजी विद्यार्थी व सध्या शिक्षक म्हणून कार्यरत असलेले मनोजकुमार बंडगर यांनी समर्पित भावनेने अविरत कष्ट घेतले. यात त्यांना सुनिल बादाडे यांची मोलाची साथ लाभली. सातत्याने शाळेला हे उत्तुंग यश मिळवून देत असल्याबद्दल श्री बंडगर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
गत चार वर्षात एन.एम.एम.एस.
परीक्षेच्या माध्यमातून १२० विद्यार्थ्यांना बावन्न लाख रुपयांची शिष्यवृत्ती मिळवून देणारी त्रिंबकराव काळे विद्यालय मलवडी ही ग्रामीण भागातील एकमेव शाळा आहे.
Edited By: Lokprant

खबरें और भी हैं
ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे निधन
By Lokprant

Latest News
04 Apr 2025 15:45:56
पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तातडीने उपचार न मिळाल्याने श्रीमती तनिषा भिसे या भगिनीला आपला प्राण गमवावा लागला. ही