सरपंच दादासाहेब काळे यांच्या योजनेचे राज्यभर अनुकरण होणार :ना. जयकुमार गोरे 

 'कर भरा व लाखोंच्या बक्षिसांचे मानकरी व्हा' योजनेचे वितरण

    आदर्श सरपंच दादासाहेब काळे यांच्या संकल्पनेतून साकारलेली लकी ड्रॉ योजनेचे राज्यातील अनेक ग्रामपंचायती अनुकरण करतील असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांनी आंधळी ग्रामपंचायतीच्या लकी ड्रॉ योजना उद्घाटन प्रसंगी केले.
 ग्रामपंचायतीचा कर भरणाऱ्या ग्रामस्थांसाठी
बक्षीस देणारे माण तालुक्यातील आंधळी हे गाव संपुर्ण महाराष्ट्रातील एकमेव गाव असेल अशा शब्दात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आंधळीकरांचे व आदर्श सरपंच दादासाहेब काळे यांचे कौतुक केले. विशेष म्हणजे ही बक्षिसे सुध्दा ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने दिलेली आहेत.
 
         यावेळी सोनिया गोरे, माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर, डी. एस. काळे, अर्जुन काळे, अरुण गोरे, संजय गांधी, किसन सस्ते बलवंत पाटील बाळासाहेब कटम, सिध्दार्थ गुंडगे, सचिन मगर, दादा जगदाळे, बापूराव पवार आदी मान्यवर उपस्थित होते. मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, 'जागर ग्रामविकासाचा' ही जास्तीत जास्त कर भरणा होण्यासाठी राबविलेली योजना कौतुकास्पद आहे. मी मंत्री झाल्यावर पहिला कार्यक्रम जो झाला तो वीस लाख घरांना मंजूरी देण्याचा. आणि त्या वीस लाखात आंधळीत बहात्तर घरांना मंजूरी मिळाली आहे.
 
      अर्जुन काळे म्हणाले, आजपर्यंत आम्ही गावासाठी काही मागितले नव्हते मात्र जयकुमार गोरे यांनी भरभरुन दिले आहे. आत्तासुद्धा उर्वरित विकासकामांसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून द्यावा. लोकनियुक्त सरपंच दादासाहेब काळे यांनी आपल्या प्रास्ताविकात बक्षिस योजनेला ग्रामस्थांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल आभार मानले. तसेच मंत्री गोरे यांनी आंधळीवर असलेली कृपादृष्टी अशीच कायम ठेवावी अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी बक्षिस विजेते तसेच बक्षिस देणारे यांचा मंत्री गोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
Edited By: Lokprant

खबरें और भी हैं

पुण्यात वेळेत उपचार न मिळाल्याने महिलेचा मृत्यू ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले चौकशीचे आदेश

Latest News

पुण्यात वेळेत उपचार न मिळाल्याने महिलेचा मृत्यू ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले चौकशीचे आदेश पुण्यात वेळेत उपचार न मिळाल्याने महिलेचा मृत्यू ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले चौकशीचे आदेश
        पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तातडीने उपचार न मिळाल्याने श्रीमती तनिषा भिसे या भगिनीला आपला प्राण गमवावा लागला. ही
७ गावांतील ग्रामस्थ पुरंदर विमानतळाविरोधात आक्रमक, आज पासून बसणार उपोषणास
राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता; पुढील २४ तास धोक्याचे; ८ जिल्ह्यांना हाय अलर्ट
नाशिक जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशू कक्षात आग
कुर्ल्यातील फिनिक्स मॉलला लागली आग; अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software