- Hindi News
- सातारा
- कवठेतील शेतकरी उत्पादक कंपनीस इस्त्राईल येथील शास्त्रज्ञांची भेट
कवठेतील शेतकरी उत्पादक कंपनीस इस्त्राईल येथील शास्त्रज्ञांची भेट

कवठे: कवठे व परिसरातील शेती व्यवसायात नवनवीन प्रयोग आपण उत्पादन वाढीचे प्रयत्न केले जात आहे. यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची ही जोड मिळत आहे. शिवाय शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रयोग तेवढेच कारणी येत आहेत. कवठे येथील प्रगतशील शेतकरी अतुल डेरे यांनी केलेल्या गट शेती व मिश्र पिकांची पाहणी करण्यासाठी परदेशातील कृषी संशोधकांनी भेट दिली.
कवठे येथील कवठे कृषी क्रांती शेतकरी उत्पादक कंपनीच आज इस्त्राईल येथील संशोधक श्रीमती इफॉट योफी यांनी भेट दिली. या भेटीत त्यांनी श्री अतुल डेरे यांनी केलेल्या आधुनिक व हायटेक शेतीची पाहणी करून ऑटोमेशन विषयी माहिती घेतली. या माहितीमध्ये हळद ,आले ,पपई, केळी, टरबूज, कलिंगड, टोमॅटो इत्यादी पिकांविषयी माहिती उपस्थित शेतकऱ्यांना संबंधित शास्त्रज्ञांनी दिली.
यावेळी कंपनीचे संचालक श्री मधुकर डेरे, अतुल डेरे,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, श्री राहुल डेरे, जिल्हा बँकेचे उपव्यवस्थापक श्री जयवंत पवार ,आर के गायकवाड ,जयदीप धुमाळ, राजकुमार माळी, संकेत बेलगुद्रे, बालाजी बिराजदार, केदार मुळे ,अतुल हिंगमिरे, महेश डेरे, विक्रम डेरे इत्यादींची उपस्थिती होती.

खबरें और भी हैं
ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे निधन
