- Hindi News
- सातारा
- साताऱ्यातील भैरवनाथ मंदिरात कलशारोहण सोहळयाचे आयोजन
साताऱ्यातील भैरवनाथ मंदिरात कलशारोहण सोहळयाचे आयोजन
साताऱ्यातील गोडोली येथे असलेल्या भैरवनाथाच्या हेमाडपंती मंदिरात कलशारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आज दि. 21 डिसेंबर रोजी हा सोहळा सुरु होणार असून दि. 24 पर्यंत विविध कार्यक्रम चालू राहतील. कलशारोहण सोहळ्या निमित्त भैरवनाथ मंदिरात चार दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भैरवनाथ मंदिर संयोजन समितीने दिलेल्या माहितीनुसार, मंदिरातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण करण्यात येणार आहे. दि. 21 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता श्रींच्या मूर्तीची ग्रामप्रदक्षिणा असून 22 रोजी शनैश्वर देवस्थान सोळशीच्या परमपूज्य नंदगिरी महाराज यांच्या हस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या निमित्ताने सायंकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत कांचनताई शेळके याचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
सोमवार दि 23 रोजी मंदिराच्या कलशारोहणाचे आयोजन केले असून सकाळी 10 वाजता पुसेगावच्या देवस्थानचे मठाधीपती सुंदरगिरी महाराज यांच्या हस्ते होणार आहे व 6 ते 9 दरम्यान महाप्रसादाचे आयोजन केले आहे. दि 24 डिसेंबर रोजी ह.भ.प.सावता महाराज फुले यांच पारायणाचा कार्यक्रम होणार आहे.
भैरवनाथ मंदिराच्या कलशारोहण व मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास खा.उदयनराजे भोसले व कॅबिनेट मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. अशी माहिती मंदिराच्या संयोजन समितीने दिली आहे.