- Hindi News
- सातारा
- कराडात महिलेची ऑनलाईन फसवणूक...16 लाखांचा घातला गंडा
कराडात महिलेची ऑनलाईन फसवणूक...16 लाखांचा घातला गंडा
राज्यात सायबर क्राईमच्या घटना वारंवार घडतना दिसत आहेत.अशीच एक घटना साताऱ्यातील कराड येथून समोर आली आहे. कराड मधील महिला डॉक्टरची ऑनलाईन फसवणूक करून तब्ब्ल 16 लाख रुपये लुटले आहेत. सदर महिलेस सीमा शुल्क विभाग आणि दिल्ली पोलिसात गुन्हा दाखल होण्याची भीती घालण्यात आली होती. दिल्ली विमानतळावर पकडण्यात आलेल्या साहित्यात त्यांच्या नावाचे 16 पासपोर्ट व ड्रग्स सापडल्याचे सांगून ही फसवणूक करण्यात आली. कराड मधील रहिवासी प्रणोती रूपेश जडगे या कृष्णा हॉस्पिटल मध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत.त्यांनी कराड शहर पोलीस स्टेशन मध्ये अज्ञातांविरोधात फिर्याद दिली असुन दोन जणांवर गुन्हा नोंद झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार्, प्रणोती जडगे यांच्या मोबाईलवर 20 सप्टेंबर रोजी सकाळी 9 च्या सुमारास अज्ञातांचा कॉल आला होता. संबंधिताने आपण इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कंट्रोल रूम मधून सीमा शुल्क अधिकारी सुमित मिश्रा बोलत असल्याचे सांगितले व तुमच्या नावाचे दिल्ली ते मलेशियासाठीचे पार्सल विमानतळावर अडवण्यात आले आहे असे सांगितले. पकडण्यात आलेल्या साहित्यात 58 एटीएम कार्ड्स, 16 पासपोर्ट, आणि 148 ग्रॅम ड्रग्स सापडले आहे. त्यासंबंधी ज्या पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे त्या अधिकाऱ्यांशी बोला असे सांगून मिश्रा नामक व्यक्तीने सांगितले व वसंतकुंज पोलीस स्टेशन मधील सुनील कुमार या व्यक्तीशी फोन जोडून दिला. प्रणोती रूपेश जडगे यांना गुन्हा दाखल होण्याची भीती घालत बँक खाती गोठविण्याचे आदेश देण्यात आले. तसेच दिल्ली येथील न्यायाल्याच्या नावे असलेल्या आदेशाची प्रत प्रणोती जडगे यांच्या मोबाईल वर व्हाट्सअप द्वारे पाठवण्यात आली. या सर्व प्रकारामुळे प्रणोती जडगे घाबरल्या.
तुम्हाला या प्रकरणातून निर्दोष पणे बाहेर पडायचे असेल तर तुमच्या खात्यावरील रक्कम रिझर्व बँकेच्या खात्यामध्ये वर्ग करा असे सुनील कुमार याने सांगितले. प्रणोती जडगे यांनी आपल्या खात्यावरील 16 लाख 25 हजार 100 रुपये सुनील कुमार यांनी दिलेल्या खाते क्रमांकावर हस्तांतरीत केली. त्यानंतर आय एम सेफ असा प्रत्येक तासाला मेसेज करण्यास सांगितले व दुसऱ्या दिवशी मॅडम सॉरी तुमचे पैसे गोठवले गेले आहेत आम्ही काहीही करू शकत नाही असा मेसेज प्रणोती यांना आला व त्यानंतर दोघांचेही फोन लागणे बंद झाल्याने प्रणोती जडगे यांना आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले व त्यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात संबंधितांविरुद्ध शुक्रवारी फिर्याद दाखल केली.या संबंधिचा तपास सहाय्यक फौजदार सुभाष फडतरे करत आहेत.