- Hindi News
- सातारा
- अडखळत केलेले व्यक्तीकार्य हीच नेतृत्वगुण संपन्नतेची पहिली पायरी-संकेत भंडारे
अडखळत केलेले व्यक्तीकार्य हीच नेतृत्वगुण संपन्नतेची पहिली पायरी-संकेत भंडारे
सुशिला शंकरराव गाढवे महाविद्यालय खंडाळा यशवंतराव चव्हाण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व विद्यार्थी विकास मंडळ संयुक्त विद्यमाने ज्ञान प्रबोधिनी नेतृत्व संवर्धन केंद्र, पुणे यांच्या समन्वयातून "अग्रदूत" टप्पा क्र. ०२ कार्यशाळा संपन्न झाली. प्रारंभी जिल्हा समन्वयक व मार्गदर्शक राजेश्वरी मंडगे यांनी महाविद्यालय युवक-युवतींना दिवसभरात सामाजिक, शैक्षणिक, प्रबोधन, संशोधन, व्यावहारिक प्रकारची कोणती आव्हानात्मक कामे करायची आहेत याची माहिती दिली.यानुसार युवा सेवकांनी विहित परिसरात जाऊन दिलेले कार्य पूर्ण करण्यासाठी आपली सर्वतोपरी क्षमता व कौशल्य वापरली व युवाकार्य पूर्ण केले.
यावेळी आशय समन्वयक संकेत भंडारे म्हणाले- "आज विद्यार्थ्यांनी नेतृत्व गुण कौशल्य पेलताना अडखळत आव्हानांचा स्वीकार केला, यातून त्यांना सामाजिक जाण व भान प्राप्त करत विहित वेळेत युवाकार्य पूर्ण केले यातून महाविद्यालयातील आठ विद्यार्थ्यांची वेल्हा,राजगड पुणे येथे विभागीय नेतृत्व निवासी शिबिरासाठी निवड झाली असे जाहिर केले"
यावेळी शुभेच्छा देताना प्राचार्य डॉ. हणमंत जाधव म्हणाले-"विद्यार्थ्यांमध्ये सुप्त नेतृत्व गुण असतो फक्त त्यांना व्यासपीठ देण्याची गरज असते, विभागीय अग्रदूत प्रकल्प साठी झालेली विद्यार्थ्यांची निवड अभिमान असून त्यांना प्रोत्साहन देणारे आणि अविरत झटणारे प्रा.अमीर इनामदार यांचे विशेष कौतुक केले.यावेळी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा ध्यासपंथावरील दीपस्तंभ ग्रंथ प्रदान करत गौरव करण्यात आला. यासाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रदीप मेंढापुरे आणि विद्यार्थ्यांची प्रमुख उपस्थिती होती.संतोष गाढवे,प्रतिक गाढवे, गेनबा चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले.