- Hindi News
- सातारा
- सातारकरांचा आनंद द्विगुणित...कॅबिनेट मंत्री पदानंतर आता सार्वजनिक बांधकाम खात्याचे मानकरी आ. शिवेंद्...
सातारकरांचा आनंद द्विगुणित...कॅबिनेट मंत्री पदानंतर आता सार्वजनिक बांधकाम खात्याचे मानकरी आ. शिवेंद्रराजे भोसले
विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या च्या आधीच मंत्री मंडळाचा विस्तार करण्यात आला होता.सर्वांना खाते वाटपा बाबत उत्सुकता होतीच. आज मंत्रिमंडळाचे खाते वाटप करण्यात आले असून जावळी विधान सभा मतदार संघातुन निवडून आलेल्या आणि राज्याच्या कॅबिनेट मंत्री पदी निवड झालेल्या आ.शिवेंद्रसिहराजे भोसले यांना सार्वजनिक बांधकाम खाते मिळाले आहे.
उद्या शिवेंद्र्राजेंचे साताऱ्यात आगमन होणार तत्पूर्वीच त्यांना मिळालेल्या खात्याची वार्ता येऊन धडकली त्यामुळे साताऱ्यात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. उद्या नीरा नदी पुलावरुन पुढे साताऱ्यातील पोवई नाका व तेथून अजिंक्य सहकारी साखर कारखाना व नंतर सुरुची बंगल्याकडे रॅली काढण्यात येणार आहे.राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री पद आणि आता सार्वजनिक बांधकाम खाते यामुळे साताऱ्यात आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे.