खेड ग्रामपंचायतीतील बोगस सही प्रकरणातील दोषीवर गुन्हे दाखल करण्याचे गटविकास अधिकाऱ्यांचे आदेश

 

         सातारा शहरालगत असणाऱ्या खेड ग्रामपंचायतीत तत्कालीन ग्रामविकास अधिकारी शशिकांत फडतरे यांच्या गैरहजेरीत बोगस सह्या करण्यात आल्याचे आढळून आल्यामुळे गटविकास अधिकारी सतिश बुद्धे यांनी दोषीवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहे.
खेड ग्रामपंचायती वर सध्या आ. महेश शिंदे यांचे वर्चस्व असून सौ. लता फरांदे सरपंच म्हणून कारभार पाहत आहेत.   खेड ग्रामपंचायत हद्दीतील गोकर्ण कॉलनीतील साहिल शेख यांनी ग्रामपंचायतीने केलेली नोंद रद्द करणे व शेत जमिनीमध्ये बेकायदेशीर टाकण्यात आलेल्या पाईपलाईन काढण्याबाबत सरपंच लता फरांदे, ग्रामपंचायत सदस्य चंद्रभागा माने, प्रियांका सपकाळ व शामराव कोळपे यांच्याविरुद्ध तक्रार दिली होती. सदर तक्रारीची दखल घेत गटविकास अधिकारी . सतिश बुद्धे यांनी पहाणी करून त्या अनुशंगाने सदर पाईप लाईन टाकताना जागा मालकाची समंती किंवा परवानगी घेतली नसल्याचे आढळून आले त्यामुळे नमुना २६ प्रमाणे कामाची जागा रितसर ताब्यात घेवून पुढील काम करण्याचे आदेश गटविकास अधिकारी यांनी दिले तरीही सदर काम नियमबाह्य पद्धतीने सुरु होते.
           दि.12 फेब्रुवारी 2024 रोजी साहिल शेख यांनी केलेल्या तक्रार अर्जात ग्रामनिधीतून बंदिस्त गटर काम गोकर्ण कॉलनीमध्ये  मंजूर होते. सदर कामाचा ठराव व कामाची वर्क ऑर्डर खेड ग्रामपंचायत मार्फत झाली असून ठरावावर करण्यात आलेली  सही व वर्क ऑर्डरवरील सही वेगळ्या वाटत असल्याने शशिकांत फडतरे यांच्या सहीचा नमुना घ्यावा व शहानिशा करून अहवाल सादर करावा असे नमूद केले होते.
      सदर उपस्थित करण्यात आलेल्या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने विस्तार अधिकारी ग्रामपंचायत कडील दिनांक 23/3/2023 रोजी मा उप अभियंता बांधकाम यांनी देण्यात आलेले अंदाजपत्रक मागणी पत्र क्रमांक 23/3/2023 रोजी घेण्यात आलेला  ठराव नंबर 58/4 मा सभा दि 3/3/2023 दिनांक 17/4/2023 नुसारआदेश पत्रे याची पाहणी करण्यात आली असून सर्वसयामध्ये भिन्नता असल्याचे दिसून येत आहे. याबाबत तत्कालीन  ग्रामविकास अधिकारी शशिकांत फडतरे यांना विचारणा केली असता सदर कागदपत्रावर मी सही केली नाही माझी सही नसून बोगस सह्या केल्या आहेत असा श्री फडतरे यांनी जबाब दिला असून मागणी पत्र13/3/2023 . वर्क ऑर्डर 17/4/2023 ठराव क्र 58/4 दि3/3/2023 सभा ठराव नक्कल यावरील सह्या वेगवेगळ्या असल्याचे दिसून येत आहे. मात्र या सह्या कोणी केल्या आहेत हे निश्चित समजून येत नाही.
      त्यामुळे गटविकास अधिकारी सतिश बुद्धे व संबंधितांवर  गुन्हे दाखल करणेचे कारवाई करून कारवाईची अहवाल कार्यालयास सादर करण्याचे आदेश दिले आहेत .कोरेगाव नगरपंचायत वर मजबूत पकड असणाऱ्या आ. महेश शिंदे यांची खेड ग्रामपंचयती वरील पकड ढिली झाली आहे अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.
 
Edited By: Lokprant

खबरें और भी हैं

  शिवेंद्रराजेंचे जावळीत जल्लोषात स्वागत

Latest News

  शिवेंद्रराजेंचे जावळीत जल्लोषात स्वागत शिवेंद्रराजेंचे जावळीत जल्लोषात स्वागत
          महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे सातारा जावली मतदारसंघात कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी मोठ्या
भारतातले पहिले थर्माकोल म्युझियम दहिवडीत 
अतित ते मत्यापूर रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात
खेड ग्रामपंचायतीतील बोगस सही प्रकरणातील दोषीवर गुन्हे दाखल करण्याचे गटविकास अधिकाऱ्यांचे आदेश
दहिवडीची स्वराली साठे कुस्ती स्पर्धेत जिल्ह्यात तिसरी

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software