- Hindi News
- सातारा
- शिवेंद्रराजेंचे जावळीत जल्लोषात स्वागत
शिवेंद्रराजेंचे जावळीत जल्लोषात स्वागत
महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे सातारा जावली मतदारसंघात कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी मोठ्या संख्येयेने कार्यकर्ते स्वागतासाठी पाचवड येथे मोठ्या संख्येयेने आले होते. शिरवळ येथून सुरु झालेली रॅली मधे शेकडो वाहने सामील झाली असल्याने महामार्ग काही काळ बंद ठेवावा लागला त्यामुळे वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जावली तालुक्याच्या वतीने पाचवड येथे स्वागत करण्यात आले. यावेळी मेढा कुडाळ करहर सह जावली तालुक्यातील अनेक सर्व सामान्य नागरिक यांनी जागो जागी उपस्थित राहून हार फुले पुष्पगुछ देऊन स्वागत केले.कुडाळ येथील स्वागत प्रसंगी बोलताना शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, जावली तालुक्याने दिलेले मताधिक्य यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी जबाबदारी दिली असून मी फक्त निमित्त मात्र असून माझा फक्त चेहरा आहे त्यामागे तुम्ही सर्वजण आहात, तुमच्या सर्वांचे प्रश्न सोडविण्यासाठी कामं करणार असून मंत्री पद मिळाल्यानंतर प्रथमच कुडाळ नगरीत येत असून कै.लालसिंग काका शिंदे कै. राजेंद्र भैय्या शिंदे यांचा आशीर्वाद घेतलाच पाहिजे त्यामुळे जावली करांचे मनःपूर्वक आभार मानावे लागतील तुमच्या साठी यापुढेही मी सदैव सोबतच आहे. नवीन जबाबदारीने आपल्या मतदार संघाचा आणखी विकास करण्याचे माझे ध्येय असेल.
यावेळी नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जेसीबी च्या साहाय्याने फुलांची उधळण करीत तसेच क्रेन च्या माध्यमातून भले मोठे हार घालून जावली करांनी स्वागत केलेला. यासाठी तालुक्याचे नेते वसंतराव मानकुमरे प्रतापगड कारखाना चेअरमन सौरभ शिंदे, जावली बाजार समिती सभापती जयदीप शिंदे, संचालक मच्छिन्द्र मुळीक माजी सभापती अरुणताई शिर्के,माजी उपसभापती हणमंतराव पार्टे भाजपा तालुका अध्यक्ष श्रीहरी गोळे, खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष शरद निकम, समीर आत्तार प्रवीण देशमाने शिक्षक बँकेचे संचालक, राहुल माने,विजय शिर्के, निलेश गायकवाड अभिजीत दुदुस्कर, पप्पू जेधे,धनंजय गोरे यांच्या सह तालुक्यातील सर्व संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येयेने उपस्थित होते.