आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज नागठाणे येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन

 क्रांतीज्योती सावित्रीबाई उत्कट क्रांतीकारी समाज सुधारक -डॉ प्रतिभा चिकमट

       सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाला प्राधान्य देवून  स्त्रीशिक्षणाचा विस्तार केला. समाजातील अनिष्ट प्रथा, परंपरा  नष्ट करून बालविवाह, विधवा पुनर्विवाह, कुमारी माता यांना संरक्षण,  विधवा आणि अनाथ मुलांसाठी आश्रमाची स्थापना , केशवपनाला प्रतिबंध घालण्यासाठी नाभिकांचा संप घडवून आणला. अशा अनेक सामाजिक सुधारणा स्त्रियांना रूढी परंपरांच्या अनिष्ट जोखंडातून मुक्त केले. स्त्रियांसाठी केलेल्या कार्यामुळे सावित्रीबाई या खऱ्या अर्थाने उत्कट क्रांतीकारक समाज सुधारक होत्या. असे उदगार लालबहादूर शास्त्री महाविद्यालय, सातारा येथील इतिहास विभागप्रमुख डॉ. प्रतिभा चिकमठ यांनी काढले.

    श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज , नागठाणे या महाविद्यालयात महिला सक्षमीकरण कक्ष व सांस्कृतिक विभाग यांच्यावतीने 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली . या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यान कार्यक्रमात 'सावित्रीच्या लेकी काल आणि आज ' या विषयावर त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन महेश गायकवाड हे होते.

     डॉ प्रतिभा चिकमठ आपल्या भाषणात पुढे म्हणाल्या, सावित्रीबाई फुले यांचा जयंती दिवस बालिका दिन व स्त्रीमुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो.  ‘जात आणि लिंगावर आधारित भेदभाव आणि अन्यायकारक वागणूक नाहीशी करण्यासाठी त्यांनी काम केले. तसेच आपल्या विचारांचा प्रसार आणि प्रचार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातूनही केला.

      या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, सावित्रीबाईंनी 19 व्या शतकात कर्मट व्यवस्थेविरुद्ध लढा दिला. विविध सुधारणा करून स्त्रियांना  'चूल आणि मूल ' या जोखंडातून मुक्त केलं. एकविसाव्या शतकातील स्त्रीयांनी त्यांचा आदर्श घेऊन मार्गक्रमण करावे. या कार्यक्रमाचे औचित्य साधून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर महिला सक्षमीकरण कक्ष या विभागाच्यावतीने भित्तिपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले.

   या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत डॉ.राजाराम कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.जयमाला उथळे यांनी केले. तर आभार प्रा. संतोष निलाखे यांनी मांडले. महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

Edited By: Lokprant

खबरें और भी हैं

माण तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दौलत नाईक व उपाध्यक्ष पदी लिंगराज साखरे यांची बिनविरोध निवड

Latest News

माण तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दौलत नाईक व उपाध्यक्ष पदी लिंगराज साखरे यांची बिनविरोध निवड माण तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दौलत नाईक व उपाध्यक्ष पदी लिंगराज साखरे यांची बिनविरोध निवड
        दहिवडी ता. माण येथिल शासकीय विश्रामगृहावर माण तालुका पत्रकार संघाची बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत माण तालुका पत्रकार
राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत सातारा संघाचा दणदणीत विजय
मांढरदेव श्री क्षेत्र काळूबाईदेवीची यात्रा सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी यंत्रणांनी समन्वयाने जबाबदाऱ्या पार पाडाव्यात- जिल्हाधिकारी संतोष पाटील
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे ऑनलाईन अर्ज करण्यास १५ जानेवारीपर्यंतची अंतिम मुदत
इचलकरंजीत दूषित पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून प्रयत्न करेन- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software