- Hindi News
- सातारा
- जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा डेरवण ता पाटण येथे स्मार्ट टीव्ही व सीसीटीव्ही कॅमेरे उद्घाटन समारं...
जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा डेरवण ता पाटण येथे स्मार्ट टीव्ही व सीसीटीव्ही कॅमेरे उद्घाटन समारंभ
जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा डेरवण या शाळेचा वागजाईवाडी केंद्रातून आदर्श शाळेमध्ये समावेश झालेला आहे.येथील शाळेमध्ये ग्रामपंचायत डेरवण च्या वतीने सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. डेरवण शाळेचा आदर्श शाळेमध्ये समावेश झाल्याने शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी ग्रामपंचायत डेरवण यांच्या वतीने स्मार्ट टीव्ही देखील देण्यात आला. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी वागजाईवाडी केंद्राच्या केंद्रप्रमुख सौ.सुरेखा जाधव मॅडम तसेच डेरवण गावच्या ग्रामपंचायत सरपंच सौ.मंगल बाखले, उपसरपंच निलेश सोनावले , ग्रामपंचायत सदस्य संजय पवार, रूपाली यादव, तंटामुक्ती अध्यक्ष आनंदा महिपाल व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय यादव, सदस्य दादासो काळुलकर, माजी सरपंच मच्छिंद्र यादव , ग्रामपंचायत अधिकारी प्रकाश रावते ,ऑपरेटर शरद मराठे,अंगणवाडी सेविका वनिता यादव, उषा जाधव, तसेच सर्व विद्यार्थ्यांचे पालक व आनंदा लोहार उपस्थित होते.
तसेच डेरवण ग्रामपंचायत मध्ये येणाऱ्या वाड्या बहिरेवाडी, कोळेकरवाडी व बोरगेवाडी या शाळांना देखील सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे देण्यात आले. कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेचे मुख्याध्यापक श्री वणवे सर यांनी सर्व उपस्थित यांना आदर्श शाळा कशी असावी याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राबविले जाणारे उपक्रम याविषयीचे मार्गदर्शन श्री. दत्तात्रय चौधरी यांनी केले. शाळेतील उपशिक्षक नागरगोजे सर यांनी कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांचे आभार मानले.