- Hindi News
- सातारा
- शंभूराज देसाई यांचे पाटण विधानसभा मतदार संघातील मेळावे संपन्न
शंभूराज देसाई यांचे पाटण विधानसभा मतदार संघातील मेळावे संपन्न
तारळे, चाफळ व मल्हारपेठ (ता. पाटण) येथे मा. ना. शंभूराज देसाई यांचे पाटण विधानसभा मतदारसंघातील जाहीर आभार मेळावे दि. 3 जानेवारी रोजी संपन्न झाले. यावेळी मा. ना. शंभूराज देसाई यांनी उपस्थितांकडून सत्कार स्वीकारला. तसेच याप्रसंगी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
यावेळी मा. ना. शंभूराज देसाई यांनी विधानसभा निवडणुकीत विक्रमी मताधिक्याने विजयी केल्याबद्दल उपस्थित बंधू-भगिनींचे आभार मानले. तसेच आपण सर्वांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आणि पाटण मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्धतेने प्रयत्नशील राहील, असा विश्वासही मा. ना. शंभूराज देसाई यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
यावेळी शिवसेना-भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्ष महायुतीचे समस्त स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक आणि नागरिक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.