- Hindi News
- सातारा
- क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नायगाव येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विकास कामां...
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नायगाव येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विकास कामांचे उदघाटन
भारतातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची दि. 3 जानेवारी रोजी जयंती साजरी केली जाते. त्यानिमित्त त्यांचे जन्मगाव नायगाव (जि. सातारा) येथे त्यांच्या स्मारकस्थळी मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांच्या समवेत उपस्थित राहून राज्याचे पर्यटन मंत्री मा. ना. शंभूराज देसाई यांनी सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले.
यावेळी आयोजित कार्यक्रमात मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. यात 'ब' वर्ग पर्यटन क्षेत्रांतर्गत उभारण्यात आलेल्या शासकीय प्रतिक्षालयाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच जलजीवन मिशनअंतर्गत वॉटर एटीएमचे, 'महाज्योती'च्या विविध योजनांच्या प्रदर्शन दालनांचे आणि महिला बचतगटांच्या उत्पादित वस्तूंच्या विक्री स्टॉल्सचेही उद्घाटन करण्यात आले. तसेच जिल्हा परिषद शाळेतील निबंध, चित्रकला व वकृत्त्व स्पर्धेतील विजेते विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण आणि विविध क्षेत्रांतील यशस्वी महिलांचादेखील सन्मान करण्यात आला.
यावेळी विधान परिषदेचे सभापती मा. रामजी शिंदे, माजी मंत्री मा. छगनजी भुजबळ यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील मंत्री मा. पंकजाताई मुंडे, मा. आदितीताई तटकरे, मा. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, मा. जयकुमारजी गोरे, मा. अतुलजी सावे, मा. मकरंदजी पाटील, आमदार मा. अतुलजी भोसले, मा. मनोजजी घोरपडे, तसेच विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, 'महाज्योती'चे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.