- Hindi News
- सातारा
- १९ लाखाचे ७८ मोबाईल आरोपीकडून हस्तगत...सपोनि अक्षय सोनवणे यांची दबंग कामगिरी
१९ लाखाचे ७८ मोबाईल आरोपीकडून हस्तगत...सपोनि अक्षय सोनवणे यांची दबंग कामगिरी
By Lokprant
On
महाराष्ट्र तसेच इतर राज्यातून चोरीस गेलेले व गहाळ झालेले एकूण १९ लाख रुपये किंमतीच्या ७८ मोबाईलचा शोध घेण्याची जबरदस्त कामगिरी दहिवडी पोलिस ठाण्याने केली आहे. सदरचे मोबाईल सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या हस्ते तक्रारदारांना परत करण्यात आले.
पोलिस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधिक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलिस अधिकारी, अश्विनी शेंडगे यांनी सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे यांना नागरिकांचे हरविलेले मोबाईल शोध घेण्यासाठी दहिवडी पोलीस ठाणे अंतर्गत विशेष पथक स्थापन करुन हरविलेले मोबाईलचा शोध घेवून ते नागरिकाना परत करण्याच्या सुचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने सदर पथकातील पोलिस कर्मचाऱ्यांनी सी. ई. आय. आर. पोर्टल व इतर तांत्रिक बाबींच्या आधारे हरविलेल्या मोबाईलबाबतची माहिती प्राप्त केली. महाराष्ट्र तसेच इतर राज्यातून चिकाटीने शोध मोहीम राबवून नागरिकांचे गहाळ / चोरी झालेले एकूण ७८ मोबाईल परत मिळवले. एप्रिल २०२४ पासून २६ लाख रुपये किंमतीचे एकूण १०२ विविध कंपन्यांचे मोबाईल हे दहिवडी पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने तक्रारदार यांना परत केले आहेत.
सदरची कारवाई ही सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलिस उपनिरीक्षक यशवंत जामदार, पोलिस हवालदार बापु खांडेकर व श्रीनिवास सानप, पोलिस नाईक नितीन धुमाळ, पोलिस कॉन्स्टेबल निलेश कुदळे, महेंद्र खाडे, असिफ नदाफ व महेश पवार (सायबर) यांच्या पथकाने केली आहे. पोलिस अधिक्षक समीर शेख व अप्पर पोलिस अधिक्षक श्रीमती वैशाली कडुकर यांनी दहिवडी पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाचे अभिनंदन केले.
Edited By: Lokprant
खबरें और भी हैं
Latest News
माण तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दौलत नाईक व उपाध्यक्ष पदी लिंगराज साखरे यांची बिनविरोध निवड
07 Jan 2025 21:17:31
दहिवडी ता. माण येथिल शासकीय विश्रामगृहावर माण तालुका पत्रकार संघाची बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत माण तालुका पत्रकार