मलवडीत महिलेचा विनयभंग करून पतीला मारहाण 

      जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून खून, मारामारी, चोरी या सोबत महिलांच्या असुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित होतो.  देशभरात तसेच राज्यात महिला अनेक विनयभंग आणि बलात्काराच्या घटना आपण ऐकतो. अशीच एक घटना सातारा येथील माण तालुक्यातून समोर आली आहे . एका महिलेचा विनयभंग केल्याची व  तिच्या पतीला लुटल्याची घटना मलवडी (ता. माण) येथे घडली.
       याबाबत मिळालेल्या  माहितीनुसार दि. २ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मलवडीवरुन दहिवडीकडे राधा जगताप (रा. पुसेसावळी, ता. खटाव) या पती सतीश जगताप यांच्यासोबत चारचाकी मधून  निघाल्या होत्या. मलवडी बसस्थानकापासून साधारण पाचशे मीटर अंतरावर प्रथमेश सावंत (रा. मलवडी, ता. माण) याने त्याची मोटार सायकल ही जगताप यांच्या गाडीला आडवी मारली. यावेळी त्यांच्यात बाचाबाची तसेच झटापट झाली. प्रथमेश सावंत याने अपशब्द वापरत शिवीगाळ केली. तसेच राधा जगताप यांचे कपडे फाडून विवस्त्र करण्याचा प्रयत्न करुन विनयभंग केला. यावेळी सतीश जगताप मध्ये आले असता प्रथमेशने सतीश जगताप यांना मारहाण केली व त्यांच्या शर्टच्या खिशातून साडेचार हजार रुपये काढून घेतले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.
     राधा जगताप यांच्या तक्रारीवरुन प्रथमेश सावंत यावर   गुन्हा दाखल करण्यात आला व  प्रथमेश सावंत याला पोलिसांनी अटक करुन दहिवडी न्यायालयासमोर हजर केले. न्यायाधीशांनी त्याला तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे करत आहेत.
Edited By: Lokprant

खबरें और भी हैं

माण तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दौलत नाईक व उपाध्यक्ष पदी लिंगराज साखरे यांची बिनविरोध निवड

Latest News

माण तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दौलत नाईक व उपाध्यक्ष पदी लिंगराज साखरे यांची बिनविरोध निवड माण तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दौलत नाईक व उपाध्यक्ष पदी लिंगराज साखरे यांची बिनविरोध निवड
        दहिवडी ता. माण येथिल शासकीय विश्रामगृहावर माण तालुका पत्रकार संघाची बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत माण तालुका पत्रकार
राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत सातारा संघाचा दणदणीत विजय
मांढरदेव श्री क्षेत्र काळूबाईदेवीची यात्रा सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी यंत्रणांनी समन्वयाने जबाबदाऱ्या पार पाडाव्यात- जिल्हाधिकारी संतोष पाटील
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे ऑनलाईन अर्ज करण्यास १५ जानेवारीपर्यंतची अंतिम मुदत
इचलकरंजीत दूषित पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून प्रयत्न करेन- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software