- Hindi News
- सातारा
- सावित्रीबाई फुले जयंती निमित्त लिंब येथे रक्तदान शिबिराचे आयोजन
सावित्रीबाई फुले जयंती निमित्त लिंब येथे रक्तदान शिबिराचे आयोजन
लिंब (ता.सातारा) येथे क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांच्या १९४ व्या जयंतीनिमित्त क्रांतीसुर्य महात्मा फुले प्रतिष्ठान, लिंब व अक्षय ब्लड बँक सातारा यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. शिबिराचा प्रारंभ लिंब गावचे ज्येष्ठ नागरिक दिपक शिंदे, नवनाथ शिंदे व ह.भ.प अमित महाराज सावंत तसेच अक्षय ब्लड बँकेचे जनसंपर्क अधिकारी संदीप सकटे यांनी दीप प्रज्वलन करून केला. शिबिरामध्ये तब्बल 10 महिला रक्तदात्यांनी व 60 पुरुष असे 70 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
रक्तदान केल्यानंतर प्रतिष्ठानच्या वतीने सर्व रक्तदात्यांना विविध भेटवस्तू आणि सत्यशोधक समाजाचे कॅलेंडर भेट म्हणून दिले. शिबिरामध्ये ब्लड बँकेच्या राजू राठोड, सागर जाधव, दिव्या साबळे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी प्रतिष्ठानच्या युवा कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. शिबिरानंतर प्रतिष्ठानच्या वतीने अक्षय ब्लड बँकेच्या संपूर्ण टीमला महात्मा फुले व सावित्रीआई फुले यांची प्रतिमा व पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला.