- Hindi News
- सातारा
- श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह विद्यालय लिंब येथे आईबाप मायबाप विषयावर व्याख्यानाचे आयोजन
श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह विद्यालय लिंब येथे आईबाप मायबाप विषयावर व्याख्यानाचे आयोजन
लिंब ता. सातारा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 194 व्या जयंतीनिमित्त क्रांतीसुर्य महात्मा फुले प्रतिष्ठान, लिंब यांच्यावतीने आईबाप मायबाप या विषयावरती श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह विद्यालय लिंब या शाळेमध्ये व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी बोलताना वक्ते अण्णासाहेब शिंदे म्हणाले की, संस्कारक्षम मुले घडने ही काळाची गरज आहे. लहान वयातच मुलांच्या मनात आई-वडिलांचे संस्कार रुजवणे गरजेचे आहे. त्याचबरोबर यावेळी बोलताना त्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा महिमा देखील विद्यार्थ्यांना सांगितला. गुलामगिरी मध्ये अडकलेल्या आणि अज्ञानाच्या अंधकारात गुरफटलेल्या स्त्रियांना शिक्षण देऊन त्यांच्या आयुष्यात ज्ञानाची ज्योत लावणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना आपल्याला कदाचित विसरता येणार नाही याची सुद्धा त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना जाणीव करून दिली.
यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लिंब नंबर एक, सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूल लिंब मधील सर्व ग्रामस्थ, पालक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. कार्यक्रम पार पाडण्यासाठी शिक्षक कचरे सर यांनी खूप सहकार्य केले. यावेळी मुख्याध्यापक जाधव सर, गायकवाड सर तसेच इतर सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.