- Hindi News
- सातारा
- राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत प्रा. अमीर इनामदार द्वितीय
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत प्रा. अमीर इनामदार द्वितीय
सत्यशोधक विद्यार्थी महाराष्ट्र, धुळे आयोजित २६ नोव्हेंबर संविधान दिन व २८ नोव्हेंबर २०२४ महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत पश्चिम महाराष्ट्र विभागात सुशिला शंकरराव गाढवे महाविद्यालय, खंडाळा मधील राज्यशास्त्र विभागात कार्यरत असणारे प्रा. अमीर इनामदार यांनी द्वितीय क्रमांक पटकवला. त्यांनी "भारतीय संविधानापुढील आव्हाने" या विषयावर अभ्यासपूर्ण लेखन केले आहे. ०३ जानेवारी २०२५ सावित्रीआई फुले जयंतीचे औचित्य साधत आभासी प्रणाली द्वारे मान्यवरांच्या उपस्थितीत या स्पर्धेचा निकाल जाहिर करण्यात आला. या समारंभासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी इतिहास विभागप्रमुख व ज्येष्ठ अभ्यासक डॉ. उमेश बगाडे व सत्यशोधक डेमोक्रेटीक पार्टीचे सचिव कॉ. सिद्धार्थ जगदेव यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी निबंध स्पर्धा हेतू आणि वैचारिक चळवळ भूमिका विवेचन करताना करताना डॉ.बगाडे म्हणाले-"जगण्याच्या प्रवाहात चिकित्सा करण्याच्या तऱ्हा भिन्न स्वरूपाच्या असतात, निबंध स्पर्धेतील विशिष्ट विषयावर सखोल विचार व्यक्त करण्यासाठी वाचन, आकलन, चिकित्सा, चिंतन ची गरज पूर्ण करून लिहिणारे व्यक्त होतात.निबंध स्पर्धेतून प्रत्येक स्पर्धक स्व बोधाच्या जाणीवेतून व्यक्त झालाय,याबद्दल सर्व स्पर्धकांचे अभिनंदन केले."
कॉ. सिद्धार्थ जगदेव म्हणाले-"सत्यशोधक विद्यार्थी संघटना गेली ४० दशके विद्यार्थी जडणघडणं आणि न्याय हक्कासाठी काम करत, सामाजिक-सांस्कृतिक-शैक्षणिक लढे उभे करत आलीय निबंध स्पर्धा निमित्त विचारी माणसांना जोडता आले याचा आनंद आहे" या समारंभाचे प्रास्ताविक माजी राज्य सचिव विकास मोरे यांनी,परिचय जयेश पठाडे यांनी, आभार दीपाली भालेराव, निवेदन राज्य सचिव तुषार सूर्यवंशी यांनी केले. प्रा.भूषण धनगर, विजय वाघ,वर्षा बढे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
प्रा. अमीर इनामदार यांनी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या छत्रपती शिवाजी कॉलेज,सातारा आयोजित राज्यस्तरीय बोलीभाषा काव्यलेखन स्पर्धेत "इलाक्शनचं धुमशान" ही कविता लिहिली आहे, वर्डालय मीडिया आणि पब्लिकेशन हाऊस आयोजित राष्ट्रीय पत्रलेखन स्पर्धेत "लोकशाहीस पत्र" वैचारिक लेख लिहिला आहे. तसेच जनअभिव्यक्त जाहिरनामा,पुढारी व्हिजन फोरम मध्ये सातारा जिल्ह्याच्या विकासाचा १२ कलमी शाश्वत आराखडा असे वैचारिक-सर्जनशील लेख तसेच ग्रामीण विनोदी कथा प्रसिद्ध आहेत.
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेतील यशाबद्दल प्रा. इनामदार यांना मान्यवर,विद्यार्थी शुभचिंतक यांचेकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत.