- Hindi News
- सातारा
- १२ जानेवारी रोजी माण तालुका सेवानिवृत्त संघटनेच्या वार्षिक सभेचे आयोजन
१२ जानेवारी रोजी माण तालुका सेवानिवृत्त संघटनेच्या वार्षिक सभेचे आयोजन
By Lokprant
On
सातारा जिल्ह्यातील माण तालुका सेवानिवृत्त संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा 'पेन्शनर्स डे' रविवार दि.१२ रोजी श्रीराम मंगल कार्यालय गोंदवले बुद्रुक या ठिकाणी आयोजित केली आहे. या सभेमध्ये नवीन पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करणे, जमाखर्च सादर करून नवीन विषयास मंजुरी देणे, नवीन ऑडिटरची नेमणूक करणे, घटनेतील नियमावलीमध्ये दुरुस्ती करणे, ऐनवेळच्या विषयावर चर्चा करणे इत्यादी विषयावर चर्चा होणार आहे.
या सभेसाठी लक्ष्मण पिसे गटशिक्षणाधिकारी माण, सुदाम खरात विभागीय उपाध्यक्ष पुणे, महा पेन्शनर्स असो पुणे , बाबासो शिंदे उपाध्यक्ष सातारा जिल्हा सेवा निवृत्त संघटना सातारा, बाबुराव धनावडे सरचिटणीस सातारा जिल्हा सेवानिवृत्त संघटना सातारा, शिवाजी साळुंखे चिटणीस, सेवानिवृत्त संघटना इत्यादी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमासाठी स्वागतोत्सुक श.भि. दडस (अध्यक्ष),अ. बा. मासाळ. (उपाध्यक्ष), रा. दि. साखरे (उपाध्यक्ष),ध. तु. गंभरे (कार्याध्यक्ष )ह. आ. रणपिसे (सचिव )इत्यादी मान्यवरांचे व संघटनेतील कर्मचाऱ्यांचे स्वागत करतील.
Edited By: Lokprant
खबरें और भी हैं
Latest News
माण तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दौलत नाईक व उपाध्यक्ष पदी लिंगराज साखरे यांची बिनविरोध निवड
07 Jan 2025 21:17:31
दहिवडी ता. माण येथिल शासकीय विश्रामगृहावर माण तालुका पत्रकार संघाची बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत माण तालुका पत्रकार