राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत सातारा संघाचा दणदणीत विजय


    नाशिक येथे भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशन सचिव सौ.मिनाक्षी गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली 14 वर्षाखालील टेनिस क्रिकेट स्पर्धेत एकूण 24 संघानी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत सातारा शहर संघास विजेतेपद तर सातारा ग्रामीण संघास कास्यपदक मिळाले. सातारा ग्रामीण चा विराज देशमुख उत्कृष्ट फलंदाज तर सातारा शहर संघाचा नील कांबळे उत्कृष्ट गोलंदाज पुरस्काराचे मानकरी ठरले.
      या स्पर्धेत सातारा शहर संघाने नंदुरबार, वाशीम, सांगली, नाशिक संघावर मात करून उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीचा सामना सातारा ग्रामीण संघाबरोबर झाला. या सामन्यात शहर संघाने विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. अंतिम समना अहिल्यानगर या संघाबरोबर अतिशय अटीतटीचा झाला शेवटच्या षटकात सातारा संघाने विजय खेचून आणला व सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
      या संघास क्रीडाशिक्षक अक्षय आर्डे, गौरव नायकवडी, समाधान शिंदे, रोहित नरळे यांचे मार्गदर्शन लाभले, या यशाबद्दल सातारा संघाचे भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशन सचिव सौ. मिनाक्षी गिरी, टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री विलास गिरी, वूमन डायरेक्टर धनश्री गिरी, सहसचिव श्री चंद्रकांत तोरणे, खजिनदार घनश्याम सानप, क्रीडा मार्गदर्शक श्री विरभद्र कावडे, कृषिरत्न विश्वंभर बाबर, आदर्श मुख्याध्यापिका सौ सुलोचना बाबर, इंद्रजीत बाबर, विनसेंट जॉन, अभिजीत सावंत, तुकाराम घाडगे, यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
 
Edited By: Lokprant

खबरें और भी हैं

मंत्र्यांचा सुकाळ असलेल्या सातारा जिल्ह्यात आयटक महाराष्ट्र राज्य शालेय पोषण कर्मचारी यांचे जिल्हा परिषदेसमोर  भीक मांगो आंदोलन

Latest News

मंत्र्यांचा सुकाळ असलेल्या सातारा जिल्ह्यात आयटक महाराष्ट्र राज्य शालेय पोषण कर्मचारी यांचे जिल्हा परिषदेसमोर  भीक मांगो आंदोलन मंत्र्यांचा सुकाळ असलेल्या सातारा जिल्ह्यात आयटक महाराष्ट्र राज्य शालेय पोषण कर्मचारी यांचे जिल्हा परिषदेसमोर  भीक मांगो आंदोलन
            आईच्या मायेने शालेय मुलांना पोषण आहार बनवून त्यांची भूक भागवणाऱ्या शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या वर  मानधनाविना उपासमारीची वेळ आली
राजेंद्र विद्यालय खंडाळा येथे विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन
महाराष्ट्राच्या ५८व्या निरंकारी संत समागमाची पूर्वतयारी उत्साहपूर्वक
माण तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दौलत नाईक व उपाध्यक्ष पदी लिंगराज साखरे यांची बिनविरोध निवड
राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत सातारा संघाचा दणदणीत विजय

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software