माण तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दौलत नाईक व उपाध्यक्ष पदी लिंगराज साखरे यांची बिनविरोध निवड



    दहिवडी ता. माण येथिल शासकीय विश्रामगृहावर माण तालुका पत्रकार संघाची बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत माण तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दै. नवराष्ट्र, नवभारतचे प्रतिनिधी दौलत नाईक यांची बिनविरोध निवड  करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी माणदेश माझाचे संपादक लिंगराज साखरे, सचिवपदी अभिजित अवघडे, खजिनदार सचिन मंगरुळे, प्रसिद्धी प्रमुख सचिन शिंगाडे व जिल्हा प्रतिनिधी म्हणून विशाल माने यांच्या निवडी करण्यात आल्या.
     सदर बैठक जेष्ठ पत्रकार बापूराव गुंजवटे, पत्रकार संघांचे प्रमुख्य मार्गदर्शक तरुण भारतचे तालुका प्रतिनिधी लालासाहेब दडस, सत्यसह्याद्रीचे प्रतिनिधी विठ्ठल कांटकर  यांच्या प्रमुख उपस्थितीत व विशाल गुंजवटे यांच्या अध्यक्षते खाली पार पडली. यावेळी नवनाथ जगदाळे लोकमत , रुपेश कदम सकाळ, धनंजय कावडे, आनंद बडवे, दहिवडी पत्रकार संघांचे अध्यक्ष उमेश बुधावले,  दिपकराव तंडे बडवे, एल.के.सरतापे, प्रवीण राजे- प्रभात, शरद देवकुळे- लोकमत, आण्णासाहेब कोळी-पत्रकार टाइम्स, महेश कांबळे,दीपक काटकर,धनंजय पानसांडे, नवनाथ भिसे -सत्यसह्याद्री, आकाश दडस- ऐक्य, विशाल गुरव, लुनेश विरकर, शंकर पानसांडे आदी मान्यवर पत्रकार विविध माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा मान्यवरांच्या सत्कार करण्यात आला.
    माण तालुक्याची पत्रकार संघटना बळकट करण्यात येईल व पत्रकाराना संरक्षण कवच मिळण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न केले जाईल.तसेच तालुक्याचे ठिकाण असलेले दहिवडी येथे सुसज्ज पत्रकार भवन व पत्रकारांसाठी पत्रकार सोसायटी स्थापन  करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष दौलत नाईक यांनी यावेळी सांगितले.
Edited By: Lokprant

खबरें और भी हैं

मंत्र्यांचा सुकाळ असलेल्या सातारा जिल्ह्यात आयटक महाराष्ट्र राज्य शालेय पोषण कर्मचारी यांचे जिल्हा परिषदेसमोर  भीक मांगो आंदोलन

Latest News

मंत्र्यांचा सुकाळ असलेल्या सातारा जिल्ह्यात आयटक महाराष्ट्र राज्य शालेय पोषण कर्मचारी यांचे जिल्हा परिषदेसमोर  भीक मांगो आंदोलन मंत्र्यांचा सुकाळ असलेल्या सातारा जिल्ह्यात आयटक महाराष्ट्र राज्य शालेय पोषण कर्मचारी यांचे जिल्हा परिषदेसमोर  भीक मांगो आंदोलन
            आईच्या मायेने शालेय मुलांना पोषण आहार बनवून त्यांची भूक भागवणाऱ्या शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या वर  मानधनाविना उपासमारीची वेळ आली
राजेंद्र विद्यालय खंडाळा येथे विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन
महाराष्ट्राच्या ५८व्या निरंकारी संत समागमाची पूर्वतयारी उत्साहपूर्वक
माण तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दौलत नाईक व उपाध्यक्ष पदी लिंगराज साखरे यांची बिनविरोध निवड
राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत सातारा संघाचा दणदणीत विजय

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software