- Hindi News
- सातारा
- राजेंद्र विद्यालय खंडाळा येथे विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन
राजेंद्र विद्यालय खंडाळा येथे विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन
खंडाळा विभाग शिक्षण समिती संचलित राजेंद्र विद्यालय, खंडाळा इंग्लिश मिडीयम स्कुल आणि सुशिला शंकरराव गाढवे महाविद्यालय खंडाळा यांच्या संयुक्त विद्यमाने एअर गुरुजी इंटरनॅशनल लॅब,भारत समन्वयातून राजेंद्र विद्यालय प्रांगणात संपन्न झालेल्या राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान महोत्सव २०२५ अंतर्गत ०७ जानेवारी २०२४ रोजी सातारा जिल्ह्यातील पहिल्या कृत्रिम बुद्धीमत्ता आधारित तालुकास्तरीय विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रदर्शन चे आयोजन करण्यात आले.
यावेळी उदघाटन समारंभसाठी भारत एअर गुरुजी लॅब,सीईओ प्रताप पवार,महाराष्ट्र प्रशासकीय अधिकारी राजेंद्र खवले,टी.ई. कनेक्टिविटी चे एच.आर. संजय होन, पंचायत समिती खंडाळा गटविकास अधिकारी अनिल वाघमारे, विस्तार अधिकारी रमेश यादव, केंद्रप्रमुख सुनिता साबळे, खंडाळा विभाग शिक्षण समिती सचिव अनिरुद्ध गाढवे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व फीत कापून प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना संजय होन म्हणाले- "सद्यस्थितीत विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि विद्यार्थी यांचे विज्ञानाशी नाते तंत्र-संसाधनानी अधिक घट्ट झाले असून अभ्यासक्रमसोबत नव्या कल्पना सोबत नवं काहीतरी करू पाहतायत कृत्रिम बुद्धीमत्ता आधारित तालुकास्तरीय विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रदर्शन चे आयोजन ही आदर्श संकल्पना आहे याचा निश्चित विद्यार्थ्यांना फायदा होईल."बीडीओ वाघमारे म्हणाले- "खंडाळा तालुक्यात शिक्षणाचा दर्जा उंचावत विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण शिक्षणाची दारं खुली करून देण्यासाठी शिक्षणमहर्षी शंकरराव गाढवे सरांचे योगदान असाधारण असून सचिव अनिरुद्ध गाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक संस्थेचा कायापालट होत आहे याचेच उत्तम उदाहरण म्हणजे संपूर्ण जिल्ह्याला दिशादर्शक असणारी राजेंद्र विद्यालयातील एअर गुरुजी लॅब मैलाचा दगड ठरत आहे"
पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी गटशिक्षणाधिकारी गजानन आडे यांच्यासमवेत खंडाळा विभाग शिक्षण समिती संचालक एस.आर. सावंत,वसंतराव पंडित यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी आपल्या कल्पक व भन्नाट संकल्पनेतून साकारलेल्या वैज्ञानिक साहित्य संसाधन,मॉडेल्सना लहान गट व मोठया गटात पुरस्कार-२०२५ साठी एअर जी इनोव्हेशन अवॉर्ड,एअर जी सोशल इम्पॅक्ट अवॉर्ड,एअर जी यंग सायंटीस्ट अवॉर्ड,एअर जी गौरव पुरस्कारने गौरविण्यात आले.यावेळी विज्ञान प्रदर्शनात ५००० पेक्षा अधिक विद्यार्थी,२५० स्पर्धक,१२५ कीटकनाशक रोबोट,स्मार्ट रोबोट, अग्निशमन स्वयंचलित रोबोट, स्मार्ट जलशुद्धीकरण मशीन, वीजबचत पथदिवे अशा कल्पक मॉडेल चा सहभाग होता.यांचे व्यवस्थापन,नियोजन कृती कार्यात झटून काम करणाऱ्या सुशिला शंकरराव गाढवे महाविद्यालय बीसीए आणि विज्ञान विभाग मधील विद्यार्थ्यांचा "उत्कृष्ट स्वयंसेवक" म्हणून मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.या समारंभाचे प्रास्ताविक प्राचार्य शब्बीर नालबंद यांनी, निवेदन व सूत्रसंचालन प्रा. अमीर इनामदार,प्रा. प्रदीप बोरगावे यांनी आभार सोमनाथ गर्जे,पर्यवेक्षक धनंजय यांनी मानले.हा सोहळा यशस्वी होण्यासाठी राजेंद्र विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय चे सर्व शिक्षक वृंद,कार्यालयीन कर्मचारी, खंडाळा एअर गुरुजी लॅब च्या समन्वयिका पूजा चौधरी व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.