- Hindi News
- सातारा
- मंत्र्यांचा सुकाळ असलेल्या सातारा जिल्ह्यात आयटक महाराष्ट्र राज्य शालेय पोषण कर्मचारी यांचे जिल्हा प...
मंत्र्यांचा सुकाळ असलेल्या सातारा जिल्ह्यात आयटक महाराष्ट्र राज्य शालेय पोषण कर्मचारी यांचे जिल्हा परिषदेसमोर भीक मांगो आंदोलन
आईच्या मायेने शालेय मुलांना पोषण आहार बनवून त्यांची भूक भागवणाऱ्या शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या वर मानधनाविना उपासमारीची वेळ आली आहे. गेले तीन महिने शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना मानधन न मिळाल्याने त्यांच्या च्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वारंवार मागण्या करूनही शासन याकडे हेतू परस्पर दुर्लक्ष करत असल्याने आयटक महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर भिक मांगो आंदोलन करण्यात आले. मानधना बरोबरच इतर मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यामध्ये प्रामुख्याने किमान वेतन 24 हजार रुपये सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे वर्षभर मिळावे तसेच वयोवृद्ध व १० वर्षे सेवा केलेल्या कर्मचाऱ्यास किमान मासिक 1500 रुपये पेन्शन मिळावी तसेच शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यास स्वयंपाकाव्यतिरिक्त कामे सांगितल्यास त्या कामाचा वेगळा मोबदला देण्यात यावा याचबरोबर या कर्मचाऱ्यांना वर्षातून दोन ड्रेस कोड व ओळखपत्र देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.तसेच सेंट्रल किचन रद्द करण्यात यावे व त्याचबरोबर पाच तारखेला मानधन व इंधन बिलाची रक्कम खात्यात जमा करण्यात यावी अशा प्रमुख मागण्या संघटनेच्या वतीने करण्यात आल्या आहेत.
आयटक महाराष्ट्र राज्यशालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲड नदीम शेख पठाण व सह सेक्रेटरी विठ्ठल सुळेयांच्या मार्गदर्शनाखाली सदर आंदोलन करण्यात आले . या वेळी बोलताना ॲड नदीम शौकत पठाण म्हणाले की,सातारा जिल्हा हा आता मंत्र्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि त्यांच्याच जिल्हातील शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना मानधनाविना उपासमार होत आहे. या वेळी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. सातारा शहर पोलीस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.