- Hindi News
- क्रीड़ा
- आज पासुन सुरु होणार रणजी ट्रॉफी स्पर्धा....तर BCCI ने बदलले नियम
आज पासुन सुरु होणार रणजी ट्रॉफी स्पर्धा....तर BCCI ने बदलले नियम
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) देशांतर्गत क्रिकेट सीझन साठी अनेक नियमांमध्ये बदल केले आहेत. भारतात देशांतर्गत क्रिकेटच्या सामन्यांना सुरुवात झाली आहे. त्यामध्ये काही नवीन नियम लागू होणार आहेत. त्यानुसार 11 ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या रणजी ट्रॉफी मॅचेस मध्ये खेळाडू ' रिटायर्ड हर्ट ' झाल्यास त्याला पुन्हा बॅटिंग करण्याची संधी मिळणार नाही तसेच बॉलला थुंकी लावल्यास खेळाडूंकडून दंड आकारला जाईल आणि बॉल बदलला जाईल.
BCCI ही भारतातील क्रिकेटचे नियमन करणारी संस्था आहे. या संस्थेने रिटायर्ड हर्ट बाबत मोठा निर्णय घेतला आहे. अनेकवेळा बॅटिंग करणारा खेळाडू इतरांना संधी देण्यासाठी किंवा विनाकारण रिटायर्ड हर्ट होतो व टीम ला पुन्हा गरज घडल्यास तो बॅटिंग साठी येतो. आता असे करता येणार नाही. रिटायर्ड हर्ट ची सुविधा फक्त खेळात दुखापत झाल्यासच मिळेल. क्रिकबझ वेबसाईट ने दिलेल्या माहितीनुसार बॅटिंग करताना एखाद्या खेळाडूस दुखपात झाल्यास तो इनींग मधेच थांबवुन रिटायर्ड हर्ट होऊ शकतो आणि शक्य झाल्यास पुन्हा बॅटिंग साठी येऊ शकेल परंतु इतर कारणांमुळे बॅट्समनने इनिंग मधेच सोडल्यास त्याला पुन्हा बॅटिंगची संधी मिळणार नाही. हा नियम इनिंग सोबत ओव्हर मधेही लागू होईल.
या आधी बॉलला थुंकी लावल्यास दंड आकारला जात होता. परंतु आता नवीन नियमानुसार तो बॉल बदलला जाईल. हे नियम फक्त देशांतर्गत क्रिकेटसाठी लागू होतील. बाकी मॅचसाठी आयसीसी ने ठरवलेले नियम पाळले जातील.