श्रेयश अय्यरचा रणजी ट्रॉफी सामन्यात धुमाकूळ....तीन वर्षानंतर पुन्हा शतकपूर्ती

      सध्या देशात सुरू असलेल्या रणजी ट्रॉफी सामन्यात श्रेयस अय्यरने  शतक पूर्ण केले.या स्पर्धेतील एलिट गट अ मधील सामना महाराष्ट्र आणि मुंबई संघात खेळला जात आहे. श्रेयस अय्यरने तीन वर्षानंतर पुन्हा श्रेणी क्रिकेटमध्ये शतक झळकावले.भारतीय क्रिकेट संघातील कर्णधार अजिंक्य रहाणे बाद झाल्यानंतर मुंबईसाठी पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अय्यरणे युवा सलामी वीर फलंदाज आयुष म्हात्रे सोबत संघाचा डाव सावरला. दोघांनी दुसऱ्या दिवशीच्या सामन्यात 200 धावांची भागीदारी करत मुंबईला 300 धावांच्या पुढे नेले. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा सुरू झाल्यापासून श्रेयस अय्यरने   विशेष काही कामगिरी केली नव्हती. बडोद्यात झालेल्या रणजी ट्रॉफी च्या पहिल्या फेरी तो शून्यावर बाद झाला होता. दुलीप  ट्रॉफीमध्ये अय्यरने सहा डावात दोन अर्ध शतके आणि तितक्याच शून्यांसह 154 धावा केल्या होत्या व मुंबईत इराणी कप सामन्यात अय्यरणे दोन डावात 57 आणि 8 धावा केल्या. सध्या सुरू असलेल्या रणजी ट्रॉफी सामन्यात अय्यरने 131चेंडूत 9 चौकार आणि 3 षटकार मारून शतक पूर्ण केले. श्रेयने मागील प्रथम श्रेणीतील शतक नोव्हेंबर 2021 मध्ये कानपूर मध्ये न्युझीलँड विरुद्ध झळकवले होते आता तीन वर्षानंतर त्याने शतक पूर्ण करून त्याचा क्रिकेटमधील दीर्घकाळाचा दुष्काळ संपवला

Edited By: Lokprant

खबरें और भी हैं

  शिवेंद्रराजेंचे जावळीत जल्लोषात स्वागत

Latest News

  शिवेंद्रराजेंचे जावळीत जल्लोषात स्वागत शिवेंद्रराजेंचे जावळीत जल्लोषात स्वागत
          महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे सातारा जावली मतदारसंघात कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी मोठ्या
भारतातले पहिले थर्माकोल म्युझियम दहिवडीत 
अतित ते मत्यापूर रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात
खेड ग्रामपंचायतीतील बोगस सही प्रकरणातील दोषीवर गुन्हे दाखल करण्याचे गटविकास अधिकाऱ्यांचे आदेश
दहिवडीची स्वराली साठे कुस्ती स्पर्धेत जिल्ह्यात तिसरी

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software