- Hindi News
- क्रीड़ा
- आरसीबीची विजयी सलामी; गतविजेत्या केकेआरचा केला पराभव
आरसीबीची विजयी सलामी; गतविजेत्या केकेआरचा केला पराभव

कोलकत्ता : 2025च्या आयपीएल स्पर्धेतील पहिला सामना कोलकाता नाईट राईडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु यांच्यामध्ये झाला. या सामन्यात आरसीबीने जबरदस्त कामगिरी करत दणदणीत विजय मिळवला. केकेआरने दिलेल्या 175 धावांचे आव्हान आरसीबीच्या संघाने 16 व्या षटकामध्ये पूर्ण केले. या सामन्यात विराट कोहलीने धमाकेदार नाबाद 59 धावांची अर्धशतकी खेळी करत आरसीबीच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले.

गोलंदाजांकडून प्रथम गोलंदाजी करताना केकेआर सारख्या बलाढ्य संघाला 175 धावांत रोखले, गोलंदाजीत कृणाल पांड्याने 4 षटकात 29 धावा देत 3 विकेट्स घेतल्या, शिवाय जोश हेझलवूडनेही 2 विकेट्स घेतल्या. तर केकेआरकडून अजिंक्य रहाणेने 56 धावांची सर्वाधिक खेळी खेळली. लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीकडून विराटने 59 धावांची नाबाद खेळी खेळली. त्याने संघाला एकतर्फी विजय मिळवून दिली. तत्तपूर्वी फिलीप साल्टने 56 धावांची वादळी खेळी करत सामना आरसीबीच्या पारड्यात आणला. मात्र तो 56 धावांवर बाद झाला, त्याला वरुण चक्रवर्तीने बाद केले.
यानंतर देवदत्त पडिक्कलने 10 धावा करुन बाद झाला. त्यानंतर चाैथ्या क्रमाकावर आलेल्या रजत पाटीदार 34 धावांची वादळी खेळी खेळत संघाला विजायाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले, तो 34 धावांवर बाद शेवटी लियाम लिव्हिंगस्टोनने सलग चाैकर खेचत सामना 16.2 षटकात आरसीबीच्या नावे केला. अशाप्रकारे आरसीबीने आयपीएल 2025 च्या हंगामात विजयाने सुरूवात केली.

खबरें और भी हैं
ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे निधन
