महत्त्वाच्या बातम्या

मी कधीही योग्य निर्णयावर विश्वास ठेवत नाही. मी निर्णय घेऊन त्याला योग्य ठरवण्यावर विश्वास ठेवतो – रतन टाटा 

मी कधीही योग्य निर्णयावर विश्वास ठेवत नाही. मी निर्णय घेऊन त्याला योग्य ठरवण्यावर विश्वास ठेवतो – रतन टाटा 

असा विचार घेऊन रतन टाटांनी एक असामान्य व्यक्तिमत्वाने आणि आपल्या प्रभावी कौशाल्यांनी जगभरातील पिढीला प्रेरणा दिली आहे.

 भारतात जेव्हा ब्रिटिशांची सत्ता होती तेव्हा सन 1937 मध्ये त्यांचा जन्म झाला. पारशी कुटुंबात जन्मलेले रतन टाटा हे नवल टाटा आणि सुनी टाटा यांचे सुपुत्र होते.1948 मध्ये जेव्हा रतन टाटा 10 वर्षाचे होते तेव्हा त्यांचे आई वडील विभक्त झाले आणि त्यानंतर रतनजींचा सांभाळ त्यांची आजी नवजबाई यांनी केला.त्यांचे बालपण अगदी दुःखदायक होते.

  टाटा यांनी 8 वी पर्यंतचे शिक्षण मुंबई येथील कॅम्पियन स्कूल मधे घेतले. त्यानंतर त्यांनी कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूल, शिमला येथील बिशप कॉटन स्कूल आणि न्यूयॉर्क शहरातील रिव्हरडेल कंट्री स्कूलमध्ये शिक्षण सुरु ठेवले.ज्यातून त्यांनी 1955 मध्ये पदवी प्राप्त केली. पदवीनंतर त्यांनी कॉर्नेल विद्यापीठात प्रवेश घेतला. 1959 साली त्यांनी आर्किटेक्चर मध्ये पदवी घेतली. कॉर्नेल मधे असताना, टाटा अल्फा सिग्मा फी फ्रॅटरनीटीचे सदस्य बनले. 2008 मध्ये कॉनेन ला टाटांनी $50 दशलक्ष भेट दिली जे विद्यापीठाच्या इतिहासातील सर्वात मोठे देणगीदार बनले.त्यांनी आपले शिक्षण पूर्ण करून उद्योग क्षेत्रात प्रवेश केला.1970 च्या दशकात रतन टाटांना टाटा समूहात व्यवस्थापकीय पद देण्यात आले. नॅशनल रेडिओ अँड इलेक्ट्रिनिक्स च्या उपकंपनीतून त्यांनी सुरुवातीचे यश संपादन केले.1991 मध्ये जे आर डी यांनी टाटा सन्सचे अध्यक्षपद सोडले आणि रतन टाटांना त्यांचे उत्तराधिकारी म्हणून नियुक्ती केले. टाटांनी नवनिर्मितीला प्राधान्य दिले आणि तरुण प्रतिभांवर अनेक जबाबदाऱ्या सोपविल्या. उद्योग क्षेत्रात त्यांनी अतुलनीय यश संपादन केलेच आहे परंतु त्याचबरोबर ते शिक्षण, वैद्यक आणि ग्रामीण विकासाचे समर्थक होते. त्यांना भारतातील अग्रगण्य परोपकारी मानले जाते. 

 सुमारे 150 वर्षांची उद्योग परंपरा असलेल्या टाटा ग्रुपचा अध्यक्ष होणे हा खऱ्या अर्थाने काटेरी मुकुटच आहे. ही जबाबदारी यशस्वीरित्या पेलताना रतन टाटा यांनी दाखविलेला निर्णायक खंबीरपणा आणि मानसिक कठोरता या बाबी टाटा ग्रुपला वेगळ्याच उंचीवर घेऊन गेल्या. रतन टाटा यांनी अतिशय कुशलतेने आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या कंपन्या टेकओव्हर करतानाच माहिती तंत्रज्ञानाच्या नव्या क्षेत्रात दमदारपणे आघाडी घेतली. त्यांनी टाटा ग्रुपची विश्वासार्हता जपत त्यांनी टाटा ग्रुपचा विस्तार केला.

  उपभोगशून्य स्वामी असे ज्यांचे वर्णन केले जाते अशा रतन टाटांनी आपल्या निर्णय क्षमतेच्या आणि कौशल्याच्या जोरावर अतिशय अवाढव्य असलेल्या टाटा ग्रुपमध्ये सळाळते चैतन्य निर्माण केले आहे. त्यांचे अवघे जीवनच प्रेरणादायी आहे. नैतिकता आणि साधेपणा जपत त्यांनी उद्योगा बरोबरच देशाचा आणि समाजाचा विकास साधण्याची परंपरा समर्थपणे सांभाळली आहे. सर्वसामान्यांची स्वप्ने सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या रतन टाटांनी औद्योगिक झेप ही आकाशाला गवसनी घालणारी होती.

 जर तुम्हाला जलद पुढे जायचे असेल तर एकटे चला परंतु तुम्हाला दूरवर जायचे आहे, तर सर्वांना सोबत घेऊन चला. असा सामावून घेणारा दृष्टिकोन बाळगत त्यांनी औद्योगिक, सामाजिक क्षेत्रात अमूल्य कामगिरी केली. असामान्य व्यक्तिमत्व तरीही स्वभावातला साधेपणा जपणारे रतन टाटा हे एका भव्य उद्योगपती बरोबरच सोन्याच्या हृदयासह परोपकरी व्यक्ती म्हणून उदयास आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!