दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा निर्णय लवकरच होणार
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने 70 पैकी 48 जागा जिंकून सत्ता मिळवली आहे. आम आदमी पक्षाला (आप) 22 जागा मिळाल्या, त्यामुळे त्यांनी सत्ता गमावली.मुख्यमंत्री कोण होणार याबाबत अजूनही चर्चा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा लवकरच बैठक घेणार असून, त्यानंतर निर्णय होण्याची शक्यता आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपने मुख्यमंत्री निवडीसाठी काही नावे निश्चित केली आहेत. त्यामधूनच अंतिम नाव जाहीर होईल. नव्या सरकारचा शपथविधी 19 ते 20 फेब्रुवारी दरम्यान होण्याची शक्यता आहे.मुख्यमंत्री पदासाठी प्रवेश वर्मा यांचे नाव चर्चेत आहे. त्यांनी नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला आहे.लवकरच अधिकृत घोषणा होईल आणि नवे सरकार सत्तेवर येईल.
