महत्त्वाच्या बातम्या

सडावाघापूर येथे पालकमंत्री केसरी भव्य बैलगाडा शर्यत मा. ना. शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

  पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई  यांच्या प्रेरणेने आज सडावाघापूर येथे मा. यशराज देसाई दादा समर्थक एम. एस. ग्रुपच्या वतीने पहिल्या ‘पालकमंत्री केसरी भव्य ओपन बैलगाडा शर्यती’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मा. ना. शंभूराज देसाई यांनी  सदिच्छा भेट देऊन उपस्थितांशी संवाद साधला. याप्रसंगी मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी उपस्थित स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. तसेच आपल्या कृषी व ग्रामीण संस्कृतीशी नाळ जुळलेल्या पारंपरिक बैलगाडा शर्यतीला प्रोत्साहन देणारी स्पर्धा आयोजित केल्याबद्दल याप्रसंगी आयोजक एम. एस. ग्रुपच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे त्यांनी मन:पूर्वक अभिनंदन केले. यावेळी विभागातील पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक व बैलगाडाप्रेमी नागरिक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!