महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या खात्यावर योजनेचे 5 हप्ते जमा: साताऱ्यात लाडका भाऊ – 

          लडकी बहीण योजनेचे पैसे खात्यावर जमा झालेले पाहून देसाई आश्चर्यचकीत झाले.  योजने अंतर्गत अनेक छोट्या मोठ्या गमती घडत असतात पण अशीच एक घटना समोर आली आहे. सातारा जिल्यातील काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई यांच्या बंद असलेल्या खात्यावर योजनेचे 5 हप्ते जमा झाले आहेत. नरेश देसाई यांच्या जुन्या खात्यावर हे पैसे जमा झाले आहेत. 
        देसाई यांचे 10 वर्षापुर्वी एका बँकेत खाते होते सध्या ते बंद असून त्यांना खाते क्रमांक देखील माहित नाही. आणि त्याच खात्यावर लाडकी बहीण योजनेचे 5 हप्ते जमा झाले असून 17 ऑगस्ट रोजी 3 हजार, 1 ऑक्टोबरला दीड हजार आणि 9 ऑक्टोबर रोजी 3 हजार असे दोन हप्ते आले. त्यांना मोबाईल वर मेसेज येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेची घोषणा केली होती. या योजनेच्या बाबत अनेक आश्चर्यजनक बाबी समोर आल्या तसेच योजनेचा अर्ज भरलेला नसताना पुरुष मंडळींच्या खात्यावर योजनेचे हप्ते जमा होत आहेत
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!