महत्त्वाच्या बातम्या

सातार्‍यात 5 लाखांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा दाखल

     सातारा तालुक्यातील कोडोली येथे पोलिसांनी छापा टाकून 4 लाख 92 हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त करुन दोघांवर गुन्हा दाखल केला. संशयित दोघे सांगली शहरातील आहेत. प्रशांत प्रकाश देवकर (वय 35, रा. कुपवाड जि.सांगली), सुशांत दिनेश काळे (20, शंभर फुटी रोड, सांगली) या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. दि. 15 फेब्रुवारी रोजी ही कारवाई करण्यात आली आहे. एमएच 09 एफबी 8842 या क्रमांकाच्या वाहनातून गुटखा वाहतूक होत असल्याची माहिती सातारा शहर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी पथक तयार करुन कोडोली येथे छापा टाकला. त्यावेळी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा गुटखा होता.
बाजारभावाप्रमाणे त्याची किंमती 4 लाख 92 हजार रुपये होती. याशिवाय मोबाईल, कार असा मिळून 13 लाख 7 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. हा गुटखा बालाजी करली, पुणे याच्या फायद्यासाठी वाहतूक होत असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी सुहास कदम यांनी तक्रार दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!