महत्त्वाच्या बातम्या

आनेवाडी फाट्यावर धोकादायक खड्डा; अपघातांचे सत्र सुरूच, प्रशासन दुर्लक्ष करतेय

        जावळी तालुक्याचे प्रवेशद्वार आनेवाडी व युगप्रवर्तक कवी बा.सी मर्ढेकर यांचे मर्ढे गावाच्या प्रवेशद्वारावर असणाऱ्या बस थांब्यालगत सेवा रस्त्याच्या कडेला भला मोठा खड्डा गेली अनेक महिने खोदून ठेवला असून,यामुळे येथे अत्यंत धोकादायक परिस्थिती निर्माण झाली असून आजपर्यँत या खड्ड्यात पडून अनेक अपघात झाले असुन हा खड्डा का खोदून ठेवला आहे ? याचे कारण अजूनही कोणाला कळले नसल्याने प्रवाशी वर्गामधून संताप व्यक्त होत आहे.
    आनेवाडी टोल नाक्याजवळ असणाऱ्या उड्डाण पुलाखाली मर्ढे गावाकडे जाताना डाव्या बाजूला रस्त्यालगतच भला मोठा जवळपास दहा फूट खड्डा गेली अनेक महिने खोदून ठेवला गेला आहे,या खड्ड्यात रात्रीच्या वेळी अनेक पादचारी पडून जखमी झाले आहे.या ठिकाणी मुख्य बसथांबा असल्याने या परिसरातील अनेक गावातील प्रवासी या ठिकाणी बाहेरगावी जाण्यासाठी येत असतात, त्यामुळे या परिसरात नेहमी वर्दळ असते, गेली अनेक महिने हा खड्डा कोणी खोदून ठेवला आहे हे कोणासही माहित नाही त्यामुळे याविषयी तक्रार कोणाकडे करायची अशा संभ्रमावस्थेत येथे येणारे प्रवासी तसेच ग्रामस्थ आहेत.
      याच परिसरात अनेक व्यावसायिक देखील आहेत तसेच शेतकरी देखील आहेत यामुळे हे ठिकाण मुख्य चौकाचे ठिकाण आहे, मोठं मोठी वाहने या ठिकानावरून ये जा करत असतात, अनेक वेळा मोठी वाहने देखील या खड्ड्यात पडली आहे, हा खड्डा ताबडतोब बुजवून टाकावा अशी मागणी  प्रवासी, वाहनचालक व येथील व्यावसायिकांच्याकडून होत आहे.या परिसरात बस थांबा असल्याने कॉलेजला जाणारे विध्यार्थी नोकरदार वर्ग देखील येथे वाहणाच्या प्रतीक्षेत असतात,मात्र या खोदलेल्या खड्ड्यात कचरा टाकल्याने येथे मोठी दुर्गधी देखील पसरली आहे,त्यामुळे आरोग्याचा देखील प्रश्न निर्माण होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!