माथाडी कामगार आणि सुरक्षा रक्षकांच्या वेल्फरसंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे महत्त्वपूर्ण बैठक
नवी मुंबई: दि 24.2.2025 रोजी सह्याद्री अतिथीग्रह येथे माथाडी कामगार नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली माथाडी कामगारांनी सुरक्षा रक्षक कृती समिती यांच्यातर्फे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्या बैठकी मध्ये कष्टकरीत माथाडी कामगार व सुरक्षा रक्षक मंडळे अंतर्गत काम करणारे सुरक्षारक्षक यांच्या वेल्फरसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघटनेतर्फे सन्माननीय कामगार मंत्री आकाश फुंडकर साहेब त्यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे.या बैठकीमध्ये नरेंद्र पाटील साहेब जेष्ठ कामगार नेते बाबा आढाव साहेब सुरक्षा रक्षकांचे युवा नेते अजिंक्य माधवराव भोसले,श्री लक्ष्मणराव भोसले,प्रवीण विटेकर,सनी पाटील,बळवंतराव पवार साहेब, रांजणे साहेब, पोपटराव देशमुख साहेब माथाडीचे तर कामगार नेते उपस्थित होते. त्याच्यामध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली माथाडी मंडळे व सुरक्षारक्षक मंडळे सक्षम करण्यासंदर्भात सखोल चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे एकमताने सन्माननीय कामगार मंत्री महोदय यांनी सांगितले.
सन्माननीय कामगार मंत्री आकाश फुंडकर साहेब यांचा सत्कार आपल्या संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मणराव भोसले अजिंक्य भोसले सनी पाटील प्रवीण विटेकर यांनी केला.
