महत्त्वाच्या बातम्या

सरकारी नोकरीचे आमिष दाखवून 13 लाख रुपयांची फसवणूक 

 
      मुंबई – सरकारी नोकरी लावतो असे अमिष दाखवून मुंबईतील चार जणांची सुमारे 13 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. कोल्हापुरातील रहिवासी प्रसाद बापूसाहेब कांबळे यांच्या विरोधात माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ते ताडदेव येथील रहिवासी आहेत. दीपक कांबळे, विनायक पालेकर, संदीप कर्नेकर आणि प्रकाश जुवेकर अशी फसवणूक झालेल्यांची नावे आहेत. 
       फसवणुक प्रकरणाची तक्रार दीपक कांबळे यांनी केली आहे. 3 वर्षांपुर्वी दीपक कांबळे यांची ओळख प्रसाद कांबळे यांच्याशी झाली. प्रसाद हा कोल्हापूरचा रहिवासी असून माझी मंत्रालयात ओळख आहे इच्छुकांना सरकारी नोकरी मिळवून देतो असे त्याने दीपकला सांगितले. यासंबंधी चर्चा करण्यासाठी ते फोर्ट येथील मिंट रोडवरील आंनदभुवन हॉटेल मधे त्यांची बैठक झाली. व सरकारी नोकरी मिळवून देण्याबाबत प्रसादने चौघांना आश्वासन दिले. यासाठी त्याने 13 लाख रुपये घेतले होते. मात्र सरकारी नोकरी न मिळाल्याने चौघांनी 13 लाख रुपये मागारी देण्याची विनंती केली. परंतु पैसे मागारी मिळाले नाहीत. अशा प्रकारे प्रसाद कांबळे यांनी चौघांची फसवणूक केली आहे. असा आरोप केला आहे. चौघांनी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांकडे प्रसाद कांबळे विरुद्ध तक्रार केली आहे.
       याची पडताळणी केल्या नंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम 406 ( फौजदारी विश्वासघात) व 420 ( फसवणूक) कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने अनेकांची फसवूक केल्याचा संशय आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!