त्रिची विमानतळाहून शारजाह कडे निघालेल्या विमानात झाला होता बिघाड….परंतु शेवटी केले सेफ लँडिंग
एअर इंडिया एकसप्रेसच्या फ्लाईट क्र IX613 मधे बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. या विमानात 140 प्रवासी होते. तिरुचिरापल्लीहुन शारजाह कडे निघण्यास सायंकाळी 5.45 वाजता हे विमान रवाना झाले. त्रिची आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन टेक ऑफ करताच विमानात काही तांत्रिक अडचणी निर्माण झाला आहे असे समजताच पायलट आणि प्रवाशांची धांदल उडाली.अशा परिस्थितीत पायलटने धैर्य ठेवत 140 प्रवाशांचा विचार केला. विमानात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याची माहिती पायलटने एअरपोर्ट ओथॉरिटीला दिली याची सूचना मिळताच त्रिची विमानतळावर हाय अलर्ट सोबतच 20 ऍम्ब्युलन्स आणि अग्निशमन दलाच्या 18 गाड्यांची व्यवस्था करणात आली.
उड्डाणानंतर विमानाच्या हायड्रॉलिक सिस्टम मध्ये काहीतरी गंभीर बिघाड झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर जवळजवळ 2 तास हे विमान विमानतळावर घिरट्या घालत होते. जेणेकरून विमानातील इंधन जळून संपून जाईल.हे विमान 36000 फुट उंचीवर उडत होते परंतु अखेर पायलटने विमानास सुखरूप विमानतळावर उतरवले.
