महत्त्वाच्या बातम्या

साताऱ्यातील वाहतुकीत बदल: दुर्गादेवींची भव्य मिरवणूक आणि शाही सीमोल्लंघन सोहळा

 

       शहरात सर्व दुर्गादेवींची भव्य मिरवणूक आणि सीमोल्लंघन सोहळा असल्याने वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.  कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व भक्तांनी शांततेत सहकार्य करावे.असे आवाहन सातारा वाहतूक विभागाचे सहाय्य्क पोलीस निरीक्षक अभिजित यादव यांनी केले आहे. राजपथ मार्गावरील कमानी हौद,  देवी चौक, मोती चौक,  मारवाडी चौक या मार्गांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. कमानी हौद ते शेटे चौकापर्यन्त जाणाऱ्या वाहनांना देखील बंदी केली आहे. 
      नवरात्रोत्सव अगदी उत्साहात आणि आनंदात पार पडला त्यानंतर आज वेळ आली ती म्हणजे विसर्जनाची. सातारा शहरात  देवींची मिरवणूक आणि सीमोल्लंघन सोहळयाचे आयोजन केले आहे. यामध्ये कोणताही अडथळा न येण्यासाठी वाहतूक मार्गात बदल केला आहे. आईसाहेब देवी आणि भारतमाता देवीची भव्यदिव्य भेट पाहण्यास सर्व गावातील लोक येतात. लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने,तसेच अपघात व वाहतूक कोंडी होऊ नये. यासाठी आज शनिवारी हा बदल केला आहे.
      कर्मवीर भाऊराव पाटील पथावर शेटे चौक ते शनिवार चौक मार्गे मोती चौक पर्यंत येणारे सर्व रस्ते बंद केले आहेत. एमएससीबी ऑफिस, समर्थ टॉकीज, विसर्जन कृत्रिम तलाव, आंदेकर चौक , कारंजे पेठ, डीसीसी बँक, प्रतापगंज पेठ, मोती तळे पर्यंत येणारे सर्व रस्ते बंद केले असून समर्थ मंदिर ते चांदणी चौक हा मार्ग अवजड वाहनांसाठी बंद केला आहे.विठोबाचा नळ ते जलमंदिर हा मार्ग देखील बंद राहील. मोळाचा ओढा ते बुधवार नाका मार्गावरील शाहूपुरी पोलीस स्टेशन पर्यंतच्या वाहतुकीस प्रवेश बंद. बोगदा ते शाहू चौक हा मार्ग मोठ्या वाहनांसाठी बंद ठेवला असून कास पठाराकडे जाणारी- येणारी जड वाहने बोगदा, शेंद्रे मार्गे जातील. 
     आपली वाहने तालीम संघाजवळील मैदान, गुरुवार परज, गांधी मैदान, कोटेश्वर मैदान या चार ठिकाणी पार्किंग करावी व सर्व नागरिकांनी या मिरवणुकीस सहकार्य करावे असे आवाहन सातारा शहर वाहतूक विभागाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!